पंढरपूर

मोदींच्या प्रतिमेला घातला कांद्याचा हार

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कांद्याचे निर्यातिला बंदी केले आहे. या निर्णयाच्या विरोधात आज सोलापूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या वतीने पंढरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला कांद्याचा हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले.

सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे.त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. अशातच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. यामुळे हे निर्यात बंदी उठवावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.पंढरपूर येथील संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारने जर कांद्याची निर्यातबंदी नाही उठवली तर यापुढे सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते,शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/LFKkxC3Sk0Y” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture” allowfullscreen></iframe>

Related posts