Blog

राष्ट्रीय मतदाता दिवस

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

===============================================================================================

मतदार राजा जागा हो !

मतदान का करावे ? यासाठी जागृती करण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न…….।

मित्रानो, आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार जागृती दिवस।
सर्वप्रथम मतदार दिनाच्या सर्व मतदार नवयुवक व सर्व मतदार राजाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाही प्रसिद्ध आहे।लोकशाहिचा मूळ पाया म्हणजे मतदान करणे होय आणि जो मतदान करतो तो मतदार होय।मतदान करणे हे राष्ट्रीय कार्य आहे,आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे,आपलेआद्य कर्तव्य आहे म्हणून सर्वानी मतदान केलेच पाहिजे।

भारतात प्रत्येक वर्षी 25 जानेवारी हा दिवस मतदार जागृती दिन म्हणून साजरा केला जातो सर्वसामान्य लोकांची जागृती व्हावी, सर्वांनी मतदान करावे, मतदार जागृत व्हावा ,यासाठी लेखन रूपात केलेला एक छोटासा प्रयत्न आज राष्ट्रीय मतदाता जागृती दिवस केंद्र सरकार द्वारा साजरा केला जातो मोठ्या आनंदात व उत्साहात हा दिवस साजरा केला जातो सन 2010 मध्ये ही योजना झाली पूर्व प्रधानमंत्री श्रीमान मनमोहनसिंग द्वारा या दिनाची घोषणा करण्यात आली देशाची प्रगती जास्तीत जास्त करण्यासाठी नवयुवक आत जनजागृती व्हावी नव युवक व युवतींना मतदान करण्याचे महत्त्व समजावे म्हणून 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदाराला मतदान करता येते आपल्या देशाचे सरकार मजबूत करण्यासाठी ,समृद्ध, सुदृढ करण्यासाठी नव युवकांची खूप आवश्यकता आहे 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नव युवकांना मतदान करण्याचा सर्वतोपरी अधिकार आपल्या लोकशाहीने दिला आहे

आपण आपले मतदान कार्ड तयार करून घेऊ शकतो व मतदान करू शकतो मतदान हे गुप्त स्वरूपात असते तुमचे एक मत देशाचे भविष्य घडवू शकते अमुल्य मत देऊन आपण आपल्या देशासाठी योग्य नेता ,योग्य पक्ष, तसेच उत्कृष्ट राजा निवडू शकतो आपणच आपल्या देशाचे आधारस्तंभ असतो खरतर नव युवकांसाठी आपण मतदान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे ती सर्वांनी खबरदारी ने पार पाडली पाहिजे स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी ,देश कल्याणासाठी, देश हितासाठी आपल्या उज्वल भविष्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे जर कोणी मतदान करीत नसेल तर तो आपला हक्क कर्तव्य गमावत असतो व तशा व्यक्तीला सरकार बद्दल विचारणा करण्याची किंवा तक्रार करण्याचा कुठलाही अधिकार नसतो

मतदान करणारा व्यक्ती आपला अधिकार गमावून बसतो मतदान करणे हे राष्ट्रीय कार्य आहे देशभक्ती व लोकसेवेचे कार्य आहे ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत असे नव युवक युवती ,अंध-अपंग, विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती, तसेच भारतीय नागरिक हक्क असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मतदान करता येते आपल्या देशाचे नागरिकत्व प्राप्त झालेल्या सर्व व्यक्तीस मतदान करता येते शासनाने प्रमाणित करून दिलेल्या 17 ते 18 पूराव्या पैकी कोणताही एक पुरावा आपल्याकडे असेल तर आपण मतदान करू शकतो मतदान प्रक्रिया ही पूर्णपणे गुप्त राखली जाते चांगले सरकार, योग्य सरकार, देशाच्या प्रगती व विकासासाठी तत्पर असणारे सरकार येण्यासाठी मतदान प्रक्रिया असते भारत हे जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी तयार केलेली नियमावली ज्यामध्ये आपले हक्क आपली कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत

त्यातच ही सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे मतदान करणे होय गावागावातून शहरा शहरातून विद्यालय व महाविद्यालयातून प्रभात फेरी काढून विविध प्रकारचे उपक्रम करून प्रकल्प करून जनजागृती केली जाते व मतदान करण्याचे महत्त्व समजावून दिले जाते पुनश्च एकदा सर्व सुज्ञ मतदार राजाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी मतदान करावे हीच अपेक्षा

जय हिंद। जय भारत।

Related posts