उस्मानाबाद  भूम

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद तर्फे नॅशनल यंग लिडर प्रोग्राम (NYLP) संपन्न.

पुरूषोत्तम विष्णु बेले: – प्रतिनिधी

नेहरू युवा केंद्र ( भारत सरकार ) उस्मानाबाद यांच्या वतीने मौजे माणकेश्वर तालुका भूम येथील लोकमान्य महाविद्यालयात आज दि.12 मार्च रोजी नॅशनल यंग लिडर प्रोग्राम (NYLP) कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माते यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष के.डी.अंधारे सर , डी.डी.लोमटे सर , वाय.एस.कारकर सर , डी.बी .ढोंगे सर मार्गदर्शक वक्ते श्री.मनोज शिंदे , आजित गायकवाड, संगिता अंधारे , सचिन जाधव यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत नेहरू युवा केंद्र कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात आले.

स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर मार्गदर्शक म्हणून लाभलेले वक्ते यांनी उपस्थित युवकांना स्वच्छता ,आरोग्य ,पाणी व्यवस्थापन ,आदर्श गाव विषयांवर मार्गदर्शन केले .तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थितांना नेहरू युवा केंद्राच्या वतीने 150 मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साठे यांनी केले तर शाहु इजगज यांनी आभारप्रदर्शन केले .

Related posts