Blog

7 नोव्हेबर – विद्यार्थी दिवस

लेखक:-
श्री देविदास श्रीनिवासराव पांचाळ
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर.

आज 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस म्हणून शासनाने घोषित केले आहे 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस वाचन दिवस सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालकांना विद्यार्थी दिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! आजचा हा दिवस भारतीय इतिहासात खूप खूप महत्त्वाचा आहे भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान करते दिन दलितांचे कैवारी एक महान विचारवंत तत्त्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातील पहिले पाऊल शाळेत टाकले तो शुभ दिवस मंगल दिवस म्हणजेच साप नोव्हेंबर या भारतमातेचे सुपुत्र ज्यांनी सात नोव्हेंबर या दिवशी प्रतापसिंह हायस्कूल सातारा या शाळेत प्रवेश केला होता.

ज्यांनी आपल्या कोवळ्या मनाने पोळ्या फुलासारख्या तनाने आनंदाने या शाळेत प्रथम प्रवेश केला तो दिवस किती भाग्याचा असेल विचार करा सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती राजकीय परिस्थिती धार्मिक परिस्थिती अनुकूल असताना ज्यांनी शाळा हे एक मंदिर शिक्षक हे पूज्य गुरु मानून अभ्यासाला सुरुवात केली तो दिवस शिक्षणाचे शाळेतील पहिले पाऊल ज्यांच्या कर्तृत्वाने संयमाने बुद्धी कौशल्याने परिश्रमाने अभ्यासाने वाचनाने भारतरत्न झाले ज्यांच्या जीवनाचा इतिहास खूप आगळावेगळा आश्चर्यजनक गरिबी दारिद्र्य पीडा अवहेलना या सर्व गोष्टीचा अनुभव घेत घेत ज्या प्रमाणे एखादा मूर्तिकार दगडापासून मूर्ती बनवताना त्या दगडाला किती त्रास सहन करावा लागतो किती दुःख यातना पीडा सहन कराव्या लागतात अगदी तसंच वेदना दुःख मनाला होत असतील.

लहानपणापासून अत्यंत चंचल प्रवृत्ती चतुर चालाख चाणाक्ष व हुशार लहानपणीच ज्यांना सरस्वती प्रसन्न असलेले वाक्चातुर्य त्यांच्याकडे होते खेळकर पण खोडकर स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील वाचनवेड डॉक्टर आंबेडकरांचे वाचन वेळ तर जगप्रसिद्ध आहे कारण त्याकाळी ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन वाचन होते वेगवेगळी पुस्तके होती वाचण्यासाठी त्यांनी लहानपणापासून काय काय केले हे आपणाला वेगळे सांगायची गरज नाही पुढे त्यांनी अठरा-अठरा तास सलग अभ्यास व वाचन सुरु केले ते सतत अखंड वाचन करीत राहिले जणू वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे त्यांनी हजारो पुस्तकांचे वाचन केले अभ्यास केला व त्यातून त्यांना माणुसकी हाच खरात जगातील धर्म आहे असा सार कळला.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी राजर्षी शाहू महाराज महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असे अनेक थोर पुरुष आहेत ज्यांच्या विना आपण शिक्षणाचा विचारही करू शकत नाही या सर्व थोर मंडळीनी वाचन चळवळीला प्रोत्साहित करून खरे शिक्षण काय असते त्याची जाणीव करून दिली व समाज जागृती केली आजचा दिवस म्हणजे खास विद्यार्थ्यांसाठी चा दिवस विद्यार्थ्यांची खरी ओळख ही शाळेत गेल्यावरच होते अगदी तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा प्रवेश करून फक्त भारतालाच नव्हे तर जगाला एक मोलाचा संदेश दिला होता शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे गुलामाला गुलामगिरीची ची जाणीव करून दिल्याशिवाय तो जागृत होत नाही.

तब्बल दीडशे वर्ष इंग्रजांच्या जोखडाखाली गुलामगिरीत काढून किमान आज तरी नवीन युगात नवीन पिढीला एक महत्त्वाचा मोलाचा संदेश डॉक्टर आंबेडकरांनी दिला हाच संदेश सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा वाचन अभ्यास चिंतन याशिवाय आपण आपले चरित्र घडवू शकत नाही हाच मोलाचा संदेश आजच्या या दिनी दिला अशा या महान महात्म्याला आजच्या या विद्यार्थी दिने कोटी कोटी विनम्र अभिवादन ।

धन्यवाद…!🙏🏻🙏🏻

Related posts