उस्मानाबाद 

शकुंतलादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था, ढोकी यांच्या वतीने संक्राती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम व महिला मेळावा संपन्न.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा

ढोकी ता. उस्मानाबाद येथे मकर संक्रांती निमित्त शकुंतलादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था, दत्तनगर, ढोकी यांच्या वतीने संक्रातीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम व महिला मेळावा संपन्न

याप्रसंगी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सौभाग्यवती तथा शकुंतलादेवी महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संयोगिनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महिलांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या म्हणाल्या की, हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं की, बऱ्याच अशा स्रिया आहेत कि, त्यांना घरा बाहेर पडता येत नाही. एकमेकांना भेटायला वेळ नाही. तर तो वेळ ती भेट आपण या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांतर्गत करत असतो. याकार्यक्रमाने विचारांची देवाण-घेवाण होते.

सौ. संयोगिनी राजेनिंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, महिलांना साठी ढोकी परिसरात 2011 मध्ये सहा लाख रु. भागभांडवल सुरू करण्यात आलेली एकमेव महिला संस्था आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या संस्थेला दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत. संस्था पूर्णतः संगणिकृत आहे. तसेच यावर्षी पासून सर्व मोबाईल अँप द्व्यारे आपल्या संस्थेचे व्यवहास सुरू करण्यात आले आहेत. महिलांनी बँकेचे छोटे मोठे व्यवहार स्वःता करावेत हि बँक आपल्या सर्वांची आहे. बचत करणे हि प्रत्येक महिलेचा स्वभाव आहे. बचत गटांनी छोटे मोठे उद्योग करण्यास पुढे यावे अश्या बचत गटांना आपल्या बँके मार्फत कधीही अर्थसहाय्य करण्यात येईल असे अध्यक्षा या नात्याने सांगण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ठ उखाण्यास सौ.माधवी सोनार व दुतीय सौ.भुमिका बागरेचा यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.

या मेळाव्यास जि.प.सदस्य मीनाताई माळी, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.देविका राजेनिंबाळकर, सौ.शालीनीताई देशमुख, सौ.कल्पना (काकी) लोमटे, देवळालीच्या सरपंच सौ.मनिषा जगताप मॅडम, सौ.रेणुका सरकाळे, सौ.रेणुका बागरेचा,सौ.भाग्यशिला देशमुख, सौ.मोहर (काकी) लोमटे, सौ.अल्काताई देशमुख, माजी पं सदस्य सौ.विद्या धावारे, सौ.गंगा कलगुडे, संस्थेच्या कर्मचारी सौ.राणी भुतेकर, ढोकी व ढोकी परिसरातील महिला वर्ग व संस्थेच्या सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related posts