उस्मानाबाद 

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत खा. ओमराजे निंबाळकर चा धाराशिवच्या विविध प्रश्नांसाठी लक्षवेधी सहभाग

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा

संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आली. या बैठकीस धारशिवचे खा. मा. ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित राहून धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी चर्चेत सहभाग घेतला.

धाराशिव (उस्मानाबाद)-40 लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी म्हणून खा. ओमराजे निंबाळकर हे शेतकऱ्यांच्या निगडीत अडचणी व इतर महत्वाचे खालील मुद्दे संसदेच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडत आहेत.
1)उस्मानाबाद – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करणे.
2) प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जाचक अटी रद्द करणे.
3) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मिळणेसाठी आवश्यक असणारी अल्पभूधारक ही अट रद्द करणे.
4) लातूर – बार्शी – टेंभूर्णी हा रस्ता चौपदरीकरण करणे.

5) उस्मानाबाद तसेच महाराष्ट्रातील अतिवृष्टी झालेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची आर्थिक मदत मिळणे.
6) नारीवाडी ता.बार्शी जि.सोलापूर ते बोरफळ ता.औसा जि.लातूर हा रस्ता केंद्रीय बजटमधून करणे.
7) बार्शी – तुळजापूर हा रस्ता केंद्रीय बजटमधून करणे.
8) धाराशिव येथील पूर्वीचे पोस्ट ऑफीस मुख्यालय लातूर येथून उस्मानाबाद येथे स्थलांतरीत करणे. असे एक ना अनेक प्रश्न संसदेच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे बाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या अधिवेशनाच्या अनुषंगाने धारशिवचे खा. मा. ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवच्या अनेक प्रश्नांबाबत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांना निवेदन दिले.

या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मंत्रिमंडळातील अनेक मंत्रिमंडळ, सर्वपक्षीय खासदार, सर्वपक्षीय अनेक नेते उपस्थित होते.

Related posts