तुळजापूर

तामलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सावंत यांना “उस्मानाबाद गौरव” पुरस्कार प्रदान.

साईनाथ जगन्नाथ गवळी,
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा,
प्रतिनिधी.

उस्मानाबाद येथील धारासूर मर्दिनी बहुद्देशीय कला मंच या संस्थेमार्फत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीशराव लोंढे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या उस्मानाबाद गौरव पुरस्कार 2020 च्या पुरस्काराचे वितरण उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सन्मानपत्र, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यंदाचे हे पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी सावंत यांना त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करुन आमदार कैलास पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश लोंढे यांच्या हस्ते सन्मानपत्र, महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संस्थेचे माणिकराव साठे यांनी शिवाजी सावंत यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा आलेख मांडताना विविध कामांचा नामोल्लेख करून सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने तामलवाडी येथील हरिजन वस्ती व मातंग वस्ती सिमेंट काँक्रिट रस्ते भ्रष्टाचार प्रकरण, तामलवाडी येथील ग्रामपंचायत इमारत दुरुस्ती घोटाळा, येथील विहीर किंवा डुबकी चोरी प्रकरणाच्या घोटाळ्यात कलम 39(1) नुसार दोषी ठरवून तत्कालिन सरपंचास बडतर्फ करण्यात आले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना घोटाळा प्रकरण, तामलवाडी येथील दारू विक्री किंवा मद्य परवाने रद्द करण्यासाठीचा प्रयत्न, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोजमाप तपासणी शिबिराचे आयोजन, पी.पी.पटेल कंपनी कामगारांच्या अन्यायाविरुद्धचा लढा.

कोरोना कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या गैरहजर कालावधीतील कंपनी कामगार व टोल प्लाझा येथील कामगारांना वेतन मिळवून देण्यात यशस्वी प्रयत्न, कोरोना कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या कालावधीमध्ये महिला बचत गटाच्या कर्जाची सक्तची वसुली थांबवली, शेतकऱ्यांसाठी महावितरणद्वारे दिवसा वीज पुरवठा करून घेण्यासाठी यशस्वी प्रयत्न, शेतकऱ्यांना खराब बी-बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे आग्रही मागणी,लकी ड्रॉ द्वारे शासनाकडील मोफत व अनुदानित बी बियाणे वाटप करण्यासाठी यशस्वी प्रयत्न यशस्वी केले,शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व प्रोत्साहन राशि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न, बँक व्यवसाय प्रतिनिधी किंवा बँक मित्राद्वारे होणाऱ्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी केलेला प्रयत्न, महिला सक्षमीकरणासाठी पापड उद्योग विकासाचे काम सुरू केले.

अतिवृष्टी 2019 अनुदान वाटप घोटाळा प्रशासनास उघडकीस आणून दिला , एका राजकीय व्यक्तीची मुरुम(गौण)चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला, तामलवाडीतील सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे अर्धवट अपूर्ण काम (खंडोबा मंदिर ते तालीम) मार्गी लावले, मौजे पिंपळा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करून दुकानदारावर निलंबनाची कारवाई करून घेतली, तसेच नुकतेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत झालेल्या गोंधळवाडी-पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक, देवकुरुळी, धोत्री ते जिल्हा हद्द या सतरा ते अठरा किलोमीटर लांबीच्या नऊ कोटी रुपयेच्या निकृष्ट कामाबद्दल आवाज उठवून रस्ता सुधारुन पुर्णत्वाकडे नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न आदी कामांचा उल्लेख करून त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले.

यावेळी आमदार कैलास पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीशराव लोंढे, माणिकराव साठे, सुरज राऊत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts