पंढरपूर महाराष्ट्र

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक – अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांना प्रचार दौऱ्यामध्ये जनतेतून मिळतोय प्रचंड प्रतिसाद

सचिन झाडे –
पंढरपूर – पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा निवडणुकी मध्ये शैलाताई गोडसे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून त्यांनी आपल्या प्रचार दौऱ्यास ग्रामीण भागातून सुरुवात करून सध्याच्या पंढरपूर शहरांमधील मनिषा नगर रुक्मिणी नगर उजनी वसाहत काकडे प्लॉट अकबराली नगर वीर सागर नगर या परिसरामध्ये त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदार बंधू-भगिनींना ची भेट घेत आपले मनोगत व्यक्त करत तसेच तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेत त्यांनी आपला प्रचार दौरा तसेच जनसंवाद करीत त्या या भागामधील जनतेच्या समस्यांची तसेच तेथील सुधारणा बाबतच्या विषयी आपण शासन दरबारी जनतेच्या मूलभूत हक्कासाठी आवश्य आवाज उठू तरुण बेरोजगार तरुणांच्या हाताला उद्योगधंद्यांच्या माध्यमातून शासन दरबारी पंढरपूर व मंगळवेढा परिसरामध्ये एमआयडीसी च्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पंढरपूर शहर येथील क्षेत्र असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसुविधा साठी आरोग्यासाठी आपण अथकपणे प्रयत्न करू अशी ग्वाही देत त्यांनी आपला प्रचार दौरा या उपनगरा मधून करीत असताना महिला तसेच मतदार बंधू भगिनींच्या कडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आज दिसून येत होते.
शैलाताई गोडसे यांनी पंढरपूर शहरामधील नाथ चौक भजनदास चौक दत्त घाट महाद्वार चौक कवठेकर गल्ली तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परिसरातील भागांमध्ये त्यांनी घरोघरी जाऊन मतदार बंधू-भगिनींना ची भेट घेत आपण जनकल्याणासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी महिलांना आर्थिक दृष्ट्या सबला करण्यासाठी आपण अथक प्रयत्न करू शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या आपल्या पंढरपूर तसेच मंगळवेढा या दोन्ही शहरात मधून राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला मंदिर परिसरामधील किती लोकांनी तसेच महिलांनी त्यांचे स्वागत केले .
शैलाताई गोडसे यांनी अन्य पक्षी उमेदवारा त्यापेक्षा प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे प्रत्यक्ष मतदारांचेघरो घरी जाऊन भेटीचे सत्र सुरू केले आहे. शैलाताई गोडसे यांना पंढरपूर शहर तसेच उपनगरातून जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे

Related posts