Blog

स्वतःचे अस्तित्व जपताना – – – –

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.

म्हणतात ना, दगडाला देवपण येण्यासाठी त्याला दगडाचे घाव झेलावे लागतात, प्रचंड त्रास सहन करावा लागतो. संपूर्ण शरीर घायाळ करून घ्यावे लागते, जीव तोडून कार्य करावे लागते सहनशीलता ठेवली पाहिजे. अगदी तसंच या जगात येण्यासाठी हेच सुंदर जग पाहण्यासाठी निसर्ग सौंदर्य आकाश तारे वारे समुद्र देव देवी देवता संपूर्ण जगच पाहण्यासाठी – – – – वर दिलेला फोटो किती सुंदर फोटो आहे पहा!

एखाद्या छोट्या बियाला अंकुर फुटण्यासाठी आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावे लागते. हे किती सुंदर मोहक अंकुर अंकुरित होऊन नुकतेच वर आलेले आपल्याला दिसत आहे व सुंदर जग आनंदाने पहात आहे, वार्याने डोलत आहे, हे प्रकाशाने नाचत आहे, आपला आनंद उधळत आहे. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वर वर राहून चालत नाही. अगदी तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. अगदी तसाच हा सुंदर खुलासा नाजूक असा फोटो याचीच साक्ष आपल्याला देत आहे. अगदी माणसाचे जीवन सुद्धा या उगवत्या अंकुरा प्रमाणे आहे. आपल्या जीवनात फक्त वरवर विचार करून चालत नाही, तर आपल्या भविष्यात काय अडीअडचणी येणार असतील त्याचे नियोजन जर योग्य प्रमाणे आज पासून केले तर त्याचे फळ निश्चितच काही काळाने आपल्याला मिळेल. मोठ्या झाडाखाली राहून छोट्या झाडाला आपले अस्तित्व निर्माण करता येणार नाही. छोट्या झाडाला लागलेली फळे फुले पाहून लोक दुरूनच म्हणतील कि, आरे ही फुले फळे मोठ्या झाडांची आहेत. खूप अडचणींना तोंड द्यावे लागेल. त्यासाठी अमर्यादित स्वप्ने कधीही बघू नये. स्वप्नांना देखील मर्यादा असावी. सतत खेळकर वृत्ती, आनंदी वृत्ती, खूप महत्त्वाची आहे. आनंदी वृत्ती व सकारात्मक विचाराने आपले आरोग्य निरोगी व सुंदर राहते आणि आपले जगणे सुंदर होऊन जाते. स्वतःहसा सर्वांना हसवा पण, कधी कुणावर हसू नका. सर्वांच दुःख वाटून घ्या पण, कधी कुणाला दुखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा पण, कुणाचं रुदय जाळू नका तोडू नका. हीच जीवनाची खरी रीत आहे. जसे पेराल तसे उगवेल हा निसर्गाचाच नियम आहे. या छोट्याशा अंकुरानीआपल्याला किती सकारात्मक ऊर्जा दिली. बघा, छोटासा अंकुर निसर्ग देवतेची शक्ती आहे, ऊर्जा आहे, प्रेरणा आहे… आपल्यासाठीच आपल्या जीवना साठीच- – – – –

Related posts