सोलापूर शहर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परीक्षा फॉर्म साठी एकच काउंटर एकाच विद्यार्थ्याकडे चार-पाच जणांचा फॉर्म देत आहेत

विद्यार्थ्यांकडून तक्रार केल्यानंतर एकच काउंटर वाढवण्यात आलेला आहे
आज जर फॉर्म भरला नाही तर उद्यापासून तीनशे रुपये दंड करण्यात येणार आहे
सोलापूर विद्यापीठांमध्ये सध्या परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे या फॉर्म घेण्यासाठी महाविद्यालयाकडून फक्त एक काउंटर असल्याकारणाने गर्दी खूप वाढत आहे आणि एक व्यक्ती चार-पाच जणांचे फॉर्म घेत घेऊन जात आहे. परंतु यामध्ये एकाच व्यक्तीला तीन ते चार फॉर्म देण्यात आल्यामुळे बाकीचे विद्यार्थी तिथे फॉर्म घेतो पर्यंत वेळ लागत आहे
या ठिकाणी सर्व विभागाचे विद्यार्थी एकच काउंटर असल्याकारणाने पैसे भरण्यात उशीर होत आहे आणि अर्ज भेटण्यात सुद्धा ही उशीर होत आहे वेळेअभावी जर आज फॉर्म भरला नाही तर उद्यापासून विद्यार्थ्यांना तीनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे असे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे.

त्यामुळे आज या विद्यापीठात खूप प्रचंड गर्दी असल्याकारणाने सिक्युरिटी गार्ड असून देखील ही त्याचा उपयोग होत नाही एका विद्यार्थ्याकडे चार-पाच फॉर्म दिल्या कारणामुळे इतर विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे लाईन मध्ये उभारलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून व्यक्त करून दाखवले आहे

Related posts