उस्मानाबाद  परंडा

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी रणजीत पाटील यांची निवड.

पुरूषोत्तम विष्णु बेले/ उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी-

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार रणजीत महादेव पाटील यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघ परंडा तालुकाध्यक्ष पदी निवड पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.

अन्याय अत्याचार,भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न व कोरोना काळात निर्माण होणाऱ्या अडचणी आपल्या लेखणीतून सरकार दरबारी मांडण्यासाठी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रणजीत महादेव पाटील यांनी श्रीमंतराजे प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष,शंभुसेना महाराष्ट्र उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष,महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन,भारत-महाराष्ट्र एन जी ओ डेव्हलपमेंट उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष इ.संस्थेच्या माध्यमातून समाजकार्याचा ठसा उमटवला आहे.

पाटील यांचे सर्व सहकारी मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छा व अभिनंदन वर्षाव होत आहे.

Related posts