करमाळा

आ.संजयमामा च्या वाढदिवसानिमित्त पाच हजार पाचशे त्रेपन्न वृक्षरोपणाचा संकल्प:-जमादार

करमाळा प्रतिनिधी -(उमेश पवळ)
करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या ३१ जुलै रोजी ५३ व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात पाच हजार पाचशे त्रेपन्न झाडे लावण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. पावसाळ्याच्या तोडांवर १ जुलै पासुन हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याची सुरुवात हा वक्षारोपनाचा कार्यक्रम १ जुलै रोजी मौजे.बोरगाव येथे सकाळी आकरा वाजता वृक्षारोपण करुन सुरुवात करणार आहे अशी माहिती युवा नेते आशपाक जमादार यांनी दिली आहे.सदरच्या उपक्राची सुरुवात माढा पंचायत समीतीचे सदस्य धनराज शिंदे,युवक नेते शंभुराजे जगताप, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील व बोरगावचे उपसरपंच विनय ननवरे यांच्याहस्ते होणार आहे.यावेळी नगरसेवक कन्हैयालाल देवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत , माजी संचालक तानाजी झोळ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड,पं.स.सदस्य दत्ता जाधव,माजी पं.स.सदस्य विलास पाटील,गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग खडागळे,बोरगाव वि.सोसायटी चेअरमन विष्णू मस्के यासह तालुक्यातील आमदार शिंदे यांचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व करमाळा पत्रकार संघ उपस्थित राहणार आहेत.

पुढे बोलताना जमादार म्हणाले की,आमदार संजयमामा शिंदे यांचे करमाळा तालुक्यातील व जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हि कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहता वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून व सामाजिक उपक्रम राबवावे असे अवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन परमेश्वर भोगल,दिपक भोज, संदीप घाडगे,संदीप ननवरे, श्रीराम भोगल,निलेश पाटील,राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे ता.अध्यक्ष सर्वेश देवकर पाटील,सचिन गायकवाड,राहुल चोरमले,शितल देशमुखे,विशाल कुभांर,अभिजित सुर्यवंशी, गणेश वाडेकर, तुषार शिंदे,गणेश वाळुंजकर,राजेंद्र पवार,विक्रम कुभांर, संजय सरडे,महेश पाटील,आयुब शेख,पप्पू पठाण,समीर शेख,अशिष फकीर, स्वपनिल गांधले,अभिजित चव्हाण,विकास गायकवाड आदिनी केले आहे.

Related posts