तुळजापूर

परतीच्या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

साईनाथ गवळी,
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.

काल रात्री पासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने समंध तुळजापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आलेल्या पिकाला मुकावे लागत आहे. शेतीसह अनेक प्रकारच्या नुकसानीला लोकांना सामोरे जावे लागत आहे. अशातच हवामान खात्याने तर अतिवृष्टी चा इशारा दिला आहे.

मुसळधार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे त्यामुळे गावातील नागरीकांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व ओढे, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे अनेक गावांमध्ये ये जा करण्याचे वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे बहुतांश गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचे ही मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन चे पीक, हे या शेतात शिरलेल्या पाण्यामुळे वाया गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर संकटाना तोंड द्यावे लागते आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करुन आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या व सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related posts