पंढरपूर

आर.पी आय.चा एस.टी कर्मचारी आंदोलनास पाठिंबा.

एस.टी.आंदोलकांच्या मागण्या मान्य करुन निलंबन मागे घ्या; अन्यथा तीव्र आंदोलन करु – दिपक चंदनशिवे

पंढरपूर – गेले ७ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामडळाच्या एस टी.कर्मचा-यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे.या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. मात्र राज्य शासन आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याने दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत आहे.या आंदोलनास राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.

या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश राज्य संघटन सचिव दिपक चंदनशिवे यांनी पंढरपूर येथे एसटी स्टॅन्ड मध्ये सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे.

या प्रसंगी दिपक चंदनशिवे बोलताना म्हणाले, की राज्यात एस टी. नूतनीकरण रंगरंगोटी आणि दुरुस्तीच्या च्या नावाखाली वारेमाप खर्च केला जात आहे ,मात्र एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते आहे .गेली काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान व्यथित होऊन आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करुन त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला सेवेत सामावून घेण्यात यावे,आंदोलना दरम्यान आंदोलन दडपण्यासाठी करण्यात आलेले कर्मचाऱ्यांचे निलंबन त्वरित मागे घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी,अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिपक चंदनशिवे यांनी दिला आहे.

यावेळी दत्ता वाघमारे ,समाधन बाबर ,विजू खरे,शमुवेल साळवे,राजकुमार भोपळे,रवी भोसले,संतोष ननवरे,यांच्या आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts