तुळजापूर महाराष्ट्र

पिंपळा (बु.) ग्रामपंचायत वरील “भगवा” अबाधित ; महाविकास आघाडीचे ९ पैकी ७ उमेदवार बिनविरोध.

पिंपळा (बु.) ग्रामपंचायत वरील “भगवा” अबाधित ; महाविकास आघाडीचे ९ पैकी ७ उमेदवार बिनविरोध

शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा. जगन्नाथ गवळी यांनी राखले एकहाती वर्चस्व

एका जागेसाठी लागणार चुरस

साईनाथ जगन्नाथ गवळी
(विभागीय संपादक – मराठवाडा विभाग)

तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतुन अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. पिंपळा (बु.) ग्रामपंचायत चे चित्र स्पष्ट झाले असून, यामध्ये पिंपळा (बु.) ग्रामपंचायत वर पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे ९ पैकी ७ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून एका जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे.

पिंपळा (बु.) ग्रामपंचायत मध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार की काय? असा प्रश्न सर्वाना पडलेला होता. परंतु गावातील सर्व जाणकार, ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेत, गावातील होणारे भांडण तंटे यांना फाटा देत गावातील ग्रामपंचायत ही ९ पैकी ८ जागांवर बिनविरोध झाली आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे होणारे भांडण-तंटे टळतील अशा प्रकारच्या भावना गावकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडी कडुन विजयी झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) सौ. नीलम सोमनाथ मोरे
२) सौ. सुरेखा लक्ष्मण चव्हाण
३) सौ. गीता सुधाकर वाघमोडे
४) सौ. त्रिशाला कृष्णाथ चौगले
५) श्री. विजयकुमार प्रभाकर जाधव
६) श्री. संग्रामराजे धैर्यशील राजेपांढरे
७) श्री. योगेश मारुती गवळी

बिनविरोध निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा सर्वांच्या वतीने देण्यात आल्या. तसेच सर्व नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी बिनविरोध ग्रामपंचायत काढण्यासाठी सहकार्य केल्यामुळे जनतेचे आभार मानले. याबरोबरच सर्वांनी गावच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.

जनतेने गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ठेवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे जाहीर आभार. जनतेच्या या प्रेमापोटी च जनतेच्या सेवेसाठी कायमस्वरूपी कटिबद्ध.

गावातील होणारे भांडण-तंटे दूर करत, ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेली असून, जनतेने मागील 20 वर्षांपासून अबाधित ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो व मी कायमस्वरूपी आमचे नेते, धारशिवचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर तसेच जिल्हाप्रमुख आ. कैलासदादा पाटील यांच्या साहाय्याने जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहीन असे वचन देतो. सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे हार्दिक अभिनंदन व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी मनक:पूर्वक शुभेच्छा.
-श्री. जगन्नाथ मनोहर गवळी-भोसले (शिवसेना तालुकाप्रमुख, तुळजापूर.)

जनतेने आमच्यावरील असलेले प्रेम व विश्वास कायम दाखवत आणि होणारे मतभेद टाळत, ही निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार

यंदाची निवडणूक ही बिनविरोध करत पिंपळा (बु.) च्या गावकऱ्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे. सर्व बिनविरोध लोकप्रतिनिधींचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी व गावच्या सर्वांगीण विकासासाठी मनक:पूर्वक शुभेच्छा…!

पिंपळा (बु.) वासीयांनी आमच्यावर असलेले प्रेम व विश्वास कायम दाखवल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार. मी तालुक्याचे ज्येष्ठ नेते तथा मा. आमदार मा. मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते मा. सुनील (मालक) चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेत कायम तत्पर राहीन असे आश्वासन देतो.

– श्री. बालाजी रानबा खराबे (मा. उपसरपंच, पिंपळा बु.)

होणारे मतभेद टाळत, ही निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार

ग्रामपंचायत पिंपळा बुद्रुक सार्वत्रिक निवडणूक मध्ये सर्व लोकांचे व तरुण मित्र मंडळ यांचे मनापासून अभिनंदन करतो की गावातील तंटे व सलोख्याचे संबंध बाधित राहण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले व माननीय माजी आमदार मधुराव चव्हाण साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून गाव बिनविरोध करण्यात गावकऱ्यांनी मदत केली त्याबद्दल मी गावकऱ्यांचा तरुण मित्र मंडळ यांचा महिला गटांचा महिला बचत गटांचा मनापासून आभार व्यक्त करतो पुढील कारभार नूतन सदस्यांनी चांगल्या प्रकारे करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शुभेच्छा…!

-श्री. बालाजी सुभाष चुंगे (मा. ग्रा. पं. सदस्य, पिंपळा बु.)

मतभेदला फाटा देत बिनविरोध निवड केल्याबद्दल तमाम गावकरी बांधवांचे जाहीर आभार.

गावातील होणारे मतभेद / भांडण-तंटे यांना फाटा देत गावकऱ्यांनी ही निवड बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार…!
आमचे नेते मा. श्री. जगन्नाथ (दाजी) गवळी, श्री. गजानन चौगुले, श्री. बालाजी चुंगे तसेच श्री. बालाजी खराबे, श्री. प्रवीण चुंगे, आबा पाटील तसेच विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पंचवार्षिक काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहण्याचे मी आश्वासन देतो.

– श्री. सोमनाथ मोरे (नूतन ग्रा.पं. सदस्य)

गावातील एकोपा कायम राखत बिनविरोध काढून गावाने ठेवला आदर्श

गावातील होणारे मतभेद / भांडण-तंटे यांना फाटा देत गावकऱ्यांनी ही निवड बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार…!
आमचे नेते मा. श्री. जगन्नाथ (दाजी) गवळी, श्री. गजानन चौगुले, श्री. बालाजी चुंगे तसेच श्री. बालाजी खराबे, श्री. प्रवीण चुंगे, आबा पाटील तसेच विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पंचवार्षिक काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहण्याचे मी आश्वासन देतो.

– श्री. विजयकुमार जाधव (नूतन ग्रा.पं. सदस्य)

बिनविरोध संधी दिल्याबद्दल जनतेचे जाहीर आभार.

आमचे नेते, ज्येष्ठ बंधू तथा मार्गदर्शक, मा. श्री. जगन्नाथ (दाजी) गवळी यांच्या नेतृत्वाखाली तसेच श्री. बालाजी खराबे, श्री. बालाजी चुंगे, श्री. गजानन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. प्रवीण चुंगे व आबा पाटील यांच्या विशेष सहकार्याने जनतेने जी आमची बिनविरोध निवड केली आहे, ती निवड सार्थ ठरवत, येत्या पंचवार्षिक कालावधीत लोकांसाठी सदैव तत्पर राहीन.

– श्री. योगेश मारुती गवळी (नूतन ग्रा. पं. सदस्य)

Related posts