उस्मानाबाद  तुळजापूर

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मा. ज्ञानेश्वर घोडके यांनी एक अनाथ मुलीचे स्वीकारले पालकत्व.

वाढदिवसानिमित्त फाजील खर्च टाळून पालकत्व स्वीकारत तुळजापूर युवासेनेचे मा. उपतालुकाप्रमुख मा. ज्ञानेश्वर घोडके यांनी ठेवला आदर्श.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार कैलास दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हाभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात हा वाढदिवस विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

याच प्रकारे नळदुर्ग ता. तुळजापूर येथील इंद्रानगर केंद्रीय जिल्हा परिषद शाळेमधील एक अनाथ मुलीचा दहावी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च उचलत तिचे युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके यांनी पालकत्व घेतले आहे. या वेळेस त्यांनी प्राथमिक स्वरूपात एक हजार रुपयाचा धनादेश गडदे वैष्णवी रेशीम या मुलीकडे सुपूर्द केला. मुख्याध्यापकासह शिक्षक, सहपत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे, अमर भाळे यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. तसेच यावेळी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या मुलीची शैक्षणिक गुणवत्ता ही इतर कोणत्याही कारणास्तव दबली जाऊ नये यासाठी केलेला हा आपला एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी मा. ज्ञानेश्वर घोडके यांनी सांगितले.

यावेळेस युवासेनेचे मा. उपतालुकाप्रमुख मा. ज्ञानेश्वर घोडके, मुख्याध्यापक संजय घंटे सर, भुजबळ सर, शेख सर, अंगणवाडीसेविका सांगवीकर मॅडम, म्हेत्रे मॅडम, युवा सेनेचे माजी शहरप्रमुख अफजल कुरेशी, लक्ष्मीकांत घोडके, आकाश घोडके, राहुल घोडके, रामेश्वर घोडके, अजय पवार, किरण दुस्सा, रोहित माने, शशिकांत जाधव, शमशोद्दीन शेख यांच्यासह नळदुर्ग शहरातील शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts