उस्मानाबाद 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांच्याकडे आता जिल्ह्याचे नियोजन

उस्मानाबाद (धाराशिव) च्या जिल्हा नियोजन समितीमध्ये आ. कैलास पाटील यांचा समावेश.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद (धाराशिव)
प्रतिनिधी.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिव जिल्ह्यात सध्या नव्या दमाच्या तरुणाईला संधी देण्याचे धोरण “मातोश्री”ने चालवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, जिल्हा नियोजन समितीला सहाय्य करणाऱ्या कार्यकारी समितीमध्ये धारशिवचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता या समितीवर पूर्णपणे शिवसेनेची छाप राहणार हे यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.

जिल्ह्याच्या विकासकामांची महत्वाची भूमिका नियोजन समितीकडे असते. तसेच या समितीचे अध्यक्षपद हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे असते. धारशिवचे पालकमंत्री हे मा. ना. शंकरराव गडाख जे की शिवसेनेचे च आहेत. यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना आता गती हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये आ. कैलास पाटील हे धाराशिवच्या राजकारणातील एक नव्याने उदयास आलेला स्वच्छ चेहरा असल्याने पक्षनेतृत्वाने यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपविली आहे.

आ. कैलास पाटील यांच्यावर आलेल्या या जबाबदारीमुळे धाराशिव शिवसेनेत आणखी एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याअगोदर काही दिवसांपूर्वीच आ. कैलास पाटील यांची पंचायती राज च्या सदस्यपदी नियुक्ती झालेली होती. त्यातच जिल्हा नियोजन समितीमध्ये समावेश झाल्याने शिवसैनिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

पक्षनेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत मी आमचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंकररावजी गडाख साहेब यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळवून देईन. तसेच जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहीन.
-आ. कैलास पाटील (शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कळंब-उस्मानाबाद विधानसभा.)

आमचे मार्गदर्शक/नेते, धाराशिव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळंब-धारशिवचे आमदार मा. कैलासदादा पाटील यांच्यावर विश्वास दाखवत पक्षनेतृत्वाने आणखी एक जबाबदारी टाकली असल्याने धाराशिव शिवसेनेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे धाराशिव शिवसेनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मा. कैलासदादा, पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वास सार्थ ठरवत जिल्ह्यातील विकासाला चालना देत जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकतील असा मला ठाम विश्वास आहे.

– मा. जगन्नाथ गवळी-भोसले (शिवसेना तालुकाप्रमुख, तुळजापूर.)

Related posts