उस्मानाबाद 

परीक्षा शुल्क माफीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शिवार हेल्पलाइन कडून आवाहन – दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी दिलासा.

प्रतिक शेषेराव भोसले
उस्मानाबाद, प्रतिनिधी

” खरीप हंगामातील २०१७ व २०१८ – १९ मधील दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची प्रतीपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा ” असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

सन २०१९-२० मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. या बाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता दहावीसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in व इयत्ता बरावीसाठी http://feerefund.mh-hsc.ac.in या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी ही माहिती डॉ. भोसले यांनी दिलेली आहे.

विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट – व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

Related posts