अक्कलकोट

भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार जाहीर.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –

अवघ्या काही दिवसात नावारुपास आलेली अक्कलकोट तालुक्यातील भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेला मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थे कडून राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिलामणी बनसोडे यांनी दिली आहे.

सदर हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई पुरस्कृत राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2020 यांच्याकडून देण्यात येणार आहे. हा पुरस्कार 8 मार्च या दिवशी महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई येथे होणाऱ्या ऑनलाईन सोहळ्या मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक व क्रीडा विभागामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका ही भिमप्रकाश सामाजिक संस्थेने घेतली आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला गेला असल्याने मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णाजी जगदाळे यांचे आभार भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व संचालकांनी व्यक्त केला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिलामणी बनसोडे,सचिव रमेश बनसोडे, सहसचिव प्रदिप मडिखांबे, उपाध्यक्ष शिवानंद मडिखांबे,जोतिर्लिंग स्वामी, खजिनदार विजय भालेराव, कार्याध्यक्ष अविनाश गायकवाड, संघटक दिपक मडिखांबे, सदस्य गौतम बाळशंकर सर,सचिन मोरे,स्वप्नील बऱ्हाणपूरकर, रविंद्र बनसोडे,गौतम मडिखांबे,रवि पाटील,परशुराम भगळे,नागेश कोळी,गौतम घाटगे,मुत्तु अरुणे, राहुल भगळे,अमित शिंदे,जय बनसोडे, दशरथ मडिखांबे,राम सोनकांबळे, रोहित सोनकांबळे, प्रदिप सर्जन,शिवा नाटिकर,प्रदिप कांबळे आदी संस्थेचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related posts