करमाळा

अबॅकस ऑल इंडिया टॅलेंट सर्च आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय खुल्या अबॅकस ऑलिंपियाड स्पर्धा 2020 मध्ये करमाळा येथील कमलाई अबॅकस क्लासेस मधील विद्यार्थ्यांचे यश.

उमेश पौळ,
प्रतिनिधी करमाळा:

अबॅकस ऑल इंडिया टॅलेंट सर्च आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय खुल्या अबॅकस ऑलिंपियाड स्पर्धा 2020 मध्ये करमाळा येथील कमलाई अबॅकस क्लासेस मधील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.या मध्ये श्लेष होंनकळसे, तरेश थोरात,प्रदीशमा लबाडे,आदित्य व्हटकर,विश्वजीत जाधव यांनी चॅम्पीयनशीप मिळवली.

अबॅकस ऑल इंडिया टॅलेंट सर्च च्या वतीने दरवर्षी राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात आतापर्यंत ५३ हजार ११५ स्पर्धक विविध स्पर्धेत सहभागी झाले आहेत.या वर्षी प्रथमच आंतरराष्ट्रीय खुल्या अबॅकस ऑलिंपियाड २०२० स्पर्धेचे आयोजन ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले होते .या स्पर्धेत एकूण ८ हजार ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या मध्ये कमलाई अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी कोविड मुळे क्लासेस बंद असूनही त्यावर मात करत ऑनलाइन क्लासेस च्या माध्यमातून मंजुश्री मुसळे व जिनियस अबॅकस क्लासेस जेऊर च्या अंकिता वेदपाठवक यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली तयारी केली फस्ट रनरअप मध्ये सानिका सोरटे, प्रशंसा होंनकळसे ,वेदांत होंनकळसे,अंश किरवे ,विश्वजीत लबडे, जानव्ही लबडे,
सेकंड रनरअप मध्ये कौशल पुराणिक,दिक्षा दिवटे,सुमित घोरपडे, सलमान काझी यांनी तर कॉनसोलेशन मध्ये ईश्वरी पुराणिक,समर दोषी, चित्राक्षा क्षीरसागर,स्वराली जाधव यांनी यश मिळवले.या विषयी प्रतिक्रिया देताना क्लासेस च्या संचालिका मुसळे मॅडम म्हणाल्या की माझ्या विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद आहे . कोविड मुळे सहा महिन्यांपासून क्लास बंद आहेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांची चांगली तयारी करुन घेतली त्यामुळे z..z1 कॅटॅगरी मध्ये ३ मिनटा मध्ये ६० गणिते तसेच A..A2 कॅटॅगरी मध्ये ३ मिनिटात ८० गणिते न चुकता सोडवत आहेत.
प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related posts