पंढरपूर

शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुखपदी तानाजी मोरे यांची निवड

पंढरपूर (प्रतिनिधी):- शिवसेनेच्या पंढरपूर शहर उपप्रमुख पदी पंढरीतील धडाडीचे क्रियाशील शिवसैनिक तानाजी मोरे यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. प्रा.आ. तानाजीराव सावंत सर यांच्या आदेशानुसार नुकतेच त्यांना निवडीचे पत्र शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत सर यांच्या हस्ते देण्यात आले. यापुर्वी तानाजी मोरे यांनी शिवसेना विभागप्रमुख पदावर सक्रीयपणे काम केलेेले आहे.

आपल्या निवडीबद्दल बोलताना शिवसेनेचे नुतन पंढरपूर शहर उपप्रमुख तानाजी मोरे म्हणाले की, ‘‘माझ्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेवुन सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. प्रा.आ. तानाजीराव सावंत सर, सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर, जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, पंढरपूर मंगळवेढा उपजिल्हाप्रमुख सुधीरभाऊ अभंगराव, पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख, पंढरपूर शहर प्रमुख रविंद्र मुळे या सर्वांनी माझी उपशहरप्रमुखपदी निवड केल्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचा आभारी आहे. यापुढे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन.’’

तानाजी मोरे हे गेल्या अनेक वर्षापासुन शिवसेनेमध्ये सक्रीय राहुन राजकीय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊनच्या काळात त्यांनी लक्षवेधी समाजकार्य केलेले आहे. पंढरीतील टांगा चालक-मालक यांना अत्यावश्यक वस्तु, किराणा माल, घोड्यांसाठी चारा उपलब्ध करुन दिला. बैलगाडीवाले, छकडेवाले यांनाही अन्नधान्याचे कीट वाटप केले. तसेच रिक्षाचालकांनाही अन्नधान्याचे कीट वाटप केले. या सर्व बांधवांना लॉकडाऊनमुळे चरितार्थ चालविण्यासाठी मोठा हातभार तानाजी मोरे यांनी लावला.

लॉकडाऊनच्या संपुर्ण कालावधीत टांगा चालक, रिक्षा चालक, बैलगाडी-छकडा चालक या बांधवांना मोठा दिलासा देण्याचे लक्षवेधी कार्य तानाजी मोरे यांनी केलेले आहे. याचबरोबर लॉकडाऊन काळात पंढरपूर येथील बसस्थानकावरील बेवारस, दगडी पुल, दर्शनबारी पत्राशेड तसेच विविध घाटावरील तसेच शहर परिसराच्या विविध भागातील बेवारसांना जेवणाची मोफत सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिलेली आहे.

बचत गटातील महिला भगिणींना मायक्रोफायनान्सवाले वसुलीसाठी त्रास देत असताना संबंधित फायनान्सवाल्यांना समज देवुन येथील महिला भगिणींना दिलासा देण्याचे कार्यही त्यांनी केलेले आहे. सर्वसामान्यांच्या विविध गरजांसाठी वेळेत धावुन जाणारे व अडी-अडचणीच्या काळात सर्वांसाठी कायम उपलब्ध असणारे तानाजी मोरे यांची शिवसेना पंढरपूर शहर उपप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related posts