महाराष्ट्र

तटकरे यांच्या हस्ते माणगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना  नागली  बियाणे वाटप  

 बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रविवार  दिनांक १४ जून २०२० रोजी रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री माननीय  आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते माणगांव तालुक्यातील नागली (नाचणी) उत्पादक शेतक-यांना आज महाबीजचे नागली  (नाचणी ) सुधारीत बाणाचे बियाने वाटप करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अघिकारी, यांचे कडून माणगांव तालुक्यासाठी ९२४ किलो बियाणे प्राप्त झाले असून २३१ हॅक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. नागली तथा नाचणी हे अत्यंत पौष्टिक धान्य असून त्याला सर्व बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखर कंट्रोल करण्यात आणि मधुमेह आजार नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात तांदळाच्या ऐवजी नाचणीचा वापर करण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. त्यामुळे हे धान्य पन्नास ते साठ रुपये प्रति किलो दराने जाते. त्यामुळे पारंपरिक भात पिकांपेक्षा हे धान्य शेतकर्यांना फायदेशीर ठरते. त्यामुळे नागली पिकांची उत्पादकता वाढवून शेतक-यांना त्याचा आर्थिक लाभ होण्यासाठी श्री पांडुरंग शेळके जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी यांचे प्रयत्न आहेत.    

     या प्रसंगी मा. पालक मंत्री यांनी शेतकरी बांधवांना नागली पिकांचे चांगले अधिक उत्पादन शेतक-यांनी घेण्याचे आव्हान केले.           या प्रसंगी प्रांत अधिकारी मांणगाव प्रशाली दिघावकर, तहसिलदार प्रियंका अहिरे तसेच तालुका कृषि अधिकारी, पि. बि. नवले, गटविकास अधिकारी सतिश गाढवे, मंडळ कृषि अधिकारी शरद धर्माधिकारी उपस्थित होते.         शेतक-यांनी सुधारीत पद्धतीने लागवड करून नाचणी पिकांचे उत्पादन करावे त्यासाठी रासायनिक खते वापरण्यास उत्पादन चांगले येईल असे सांगितले.

Related posts