Blog

शिक्षक समाज घडविणारा कलावंत- – – –

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

अशी सर्वश्रेष्ठ उपाधी ज्याना दिली जाते ते म्हणजे शिक्षक. शिक्षक म्हणजे गुरु शिक्षक म्हणजे पवित्र ज्ञानदान करणारे, ज्ञानसाधना करणारे, समाजाला उत्साहित प्रेरित करून चांगली दिशा देणारे, विद्यार्थी घडवणारे, आपल्या ज्ञानदानातून देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपले नाव कमवणारे आपल्या देशाचे नाव उज्वल करणारा घटक म्हणजे शिक्षक होय. शिक्षकांना प्रथम देवाची उपमा दिली जाते. ब्रह्मस्वरूप मानले जाते. कारण तो समाजातील विविध छोट्या छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असतो.

चार भिंतीच्या आत जगातील ज्ञानसंपदा त्यांना पुरवत असतो. संपूर्ण जगात आपले नाव आपल्या देशाचे नाव उज्वल करणारा घटक म्हणजे शिक्षण होय. शिक्षक काय करू शकतात याचे उत्कृष्ट उदाहरण सन्माननीय श्रीमान रणजीत डिसले सरांना नुकताच जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. हा बहुमान भारताला पहिल्यांदाच प्राप्त झाला आहे. आपल्या मायभूचे आपल्या भारत देशाचे नाव जगात सूर्यासारखे ज्ञानाने प्रकाशमय करण्याचे महान कार्य श्रीमान डिसले सरांनी केले आहे.

हे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे।

अगदी असंच आपल्याला म्हणावं लागेल इतकं महान कार्य श्रीमान डिसले सरांनी केली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे खूप खूप रुदय पूर्वक अभिनंदन. ही बातमी ऐकून व प्रसंग टीव्हीवर ते पाहून अक्षरशः मन गहिवरून आले. देशासाठी केलेले सकारात्मक ऊर्जा देणारे प्रभावी देशप्रेम देशनिष्ठा जागवणारे कार्य सरांनी केले आहे. आजच्या नव युवकांसाठी शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्य आहे यूनेस्को व लंडन मधील वारकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा ग्लोबल टीचर प्राईज हा सन्मान सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना सात कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. हा क्षण आम्हा भारतीयांना खुप खुप गौरवास्पद आहे.

अविस्मरणीय आहे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात एक अभिनव क्रांती केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. खरोखरच सर्व भारतीयांसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी साठी तसेच सर्व जगातील शिक्षणक्षेत्रातील लोकांसाठी ऊर्जा दायक, अभिमानास्पद व गौरवास्पद आहे. प्रश्न फक्त पुरस्कार व सात कोटीचा नव्हे तर त्यांनी देशासाठी केलेली अविस्मरणीय सेवा मी तर म्हणेन एक शिक्षक सैनिक म्हणून देशाची अविस्मरणीय केलेली सेवा त्यांना मिळाली आहे. देशाचा गौरव मान सन्मान करण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. अशा या सरांना खूप खूप अभिनंदन व त्रिवार नमन डिसले सर व त्यांच्या पूर्ण परिवारांचे मनस्वी अभिनंदन…!

धन्यवाद🙏🏻🙏🏻

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर.

Related posts