भारत

उत्तर प्रदेशातील कोरोना परिस्थिती चिघळली आहे; केंद्रीय मंत्री संतोष गंगवार

उत्तर प्रदेशमध्ये सर्व काही ठीक आहे, असा दावा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. मात्र, यूपीमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, अशी पोलखोल केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी केली आहे. यासंदर्भात यूपी सरकारची पत्र लिहून कानउघडणी केली आहे.
या पत्रातमध्ये आरोग्य विभागातील अधिकारी फोन उचलत नसल्याचा आरोपही त्यात करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचा तुटवडाही यातून असल्याचा मुद्दा त्यांनी पत्रात मांडला आहे. खासदार गंगवार म्हणतात की, “रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हेलपाटे मारायला लावले जात आहेत. शासकीय रुग्णालयात आल्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठवलं जात आहे. यात रुग्णांची प्रकृती खालावत आहे. करोनाबाधित रुग्णाला कमीत कमी वेळेत रुग्णालयात दाखल केलं पाहिजे”, असंही त्यांनी पत्रात नमूद केलेले आहे.
संतोष गंगवार पुढे म्हणतात की, “वैद्यकीय उपकरणं दीडपट किंमतीने बाजारात विकली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या वस्तूंच्या किंमती सरकारने निश्चित कराव्यात. करोनाबाधित रुग्णांना बरेलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. तसेच खासगी रुग्णालयानाही करोना रुग्णालयांसारखी सुविधा दिली पाहीजे”, असंही त्यांनी सांगितलं.
“मध्य प्रदेशचं उदाहरण देत सरकारी आणि काही खासगी रुग्णालयांना ५० टक्क्यांपेक्षा कमी किंमतीत ऑक्सिजन यंत्र द्यावं. तसंच लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी आयुष्मान भारत योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात लसीकरण सुरु करावं”, अशाही सूचना त्यांनी पत्रातून दिलेल्या आहेत.

Related posts