महाराष्ट्र

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

 

नवी दिल्ली : भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Gen Bipin Rawat, Chief of Defence Staff (CDS) was on a visit to Defence Services Staff College, Wellington (Nilgiri Hills) to address the faculty and student officers of the Staff Course today.</p>&mdash; Indian Air Force (@IAF_MCC) <a href=”https://twitter.com/IAF_MCC/status/1468559350914453509?ref_src=twsrc%5Etfw”>December 8, 2021</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

IAF Helicopter Crash Death Toll: तमिलनाडु में वायुसेना का हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, CDS बिपिन रावत थे सवार, 8 लोगों की मौत | बड़ी बातें

कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते अशी माहिती मिळते.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली.

कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत

  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती.
  • बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
  • बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.
  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले ‘बेस्ट कॅडेट’ ठरले.
  • रावत यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.
  • सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.

IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर 
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.  हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं.

Related posts