Blog

नात्यांचा ओलावा संपत चालला आहे . . .

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.

नातं मग ते कोणतही असो एकमेकात गुंतलेलं असतं काही नाते रक्ताचे असतात काहीना ते मांडलेले असतात तर काही नाते मनाचे असतात नातं म्हटलं की प्रेम आलं जिव्हाळा आला मदत आली स्नेहाचा भावाला आपण सर्वांनी आपल्या लहानपणी या सर्व नात्यागोत्याचा मायेचा ओलावा अनुभवलेला आहे अगदी लहानपणी आपल्याला आजी-आजोबांनी झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्यरांच्या रेषा हवेत सोडी पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया हे सांगितलेले आहे आधुनिक काळात आपण दररोज वर्तमानपत्रे वाचतो आणि सकाळी सकाळी चहासोबत अन्याय अत्याचार खून भ्रष्टाचार भूकंप अन्यकारी कृत्य उगळून पितो दिवसभर विचार मंथन करतो.

काळाचे परिवर्तन झाले माणसे बदलली कुटुंबाचे विघटन होऊन कुटुंब लहान झाले आणि लहान कुटुंब महान कुटुंब अशी व्याख्या पुढे आली पूर्वी घरात आजी आजोबा असायचे अत्यंत प्रेमळ स्नेह करणारे संपूर्ण घराला घरपण देणारे संपूर्ण घरावर माझ्या करणारे कुत्रे मांजर गाय-वासरू बैल महेश इत्यादींना स्नेह करणारी मोठी माणसे आता उरलेली नाहीत कारण त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्यात येत आहे आई-वडिलांच्या अगदी रक्ताच्या नात्यातील जिव्हाळा सुद्धा संपत आहे पूर्वे प्राप्त काळी जात्यावरील ओव्या गाणे गवळणी वासुदेव इत्यादींचा आवाज कानी येत असे सायंकाळी अंगणातील तुळशी समोर दिवेलागण जाल्यानंतर शुभम करोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा हे संस्कार श्लोक व संस्कारांचे मोती मायेचा ओलावा शुद्ध सात्विक अंतकरणातून प्रेम आता राहिलेले नाही प्रेमात व नात्यात अंतर पडलेला दिसून येतो मायेचा पाझर फाटला आहे ना त्यांना त्यातील प्रेमाचा ओलावा संपत आलेला आहे.

छान छान गोष्टी आजीच्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत आधुनिक काळात टीव्ही ची संख्या वाढली नाचगाणे समोर आले विज्ञान तंत्रज्ञान योग सुरू झाले संगणक व इंटरनेट सुरू झाले वेगवेगळे पाश्चात्य चॅनल आपल्याकडे आले व त्या विकृत संस्कृतीचा विपरीत परिणाम बाल मनावर होऊ लागला या पाश्चात्त्य संस्कृतीमुळे नात्यांमध्ये सुद्धा आपलेपणा राहिलेला नाही आज भाऊ भावाला मानायला तयार नाही आईला आई व बापाला बाप मानायला तयार नाहीत आजची मुले शिकून मोठी झाली डॉक्टर इंजिनीयर बनून इंग्लंड अमेरिकेसारख्या राष्ट्रात उच्च शिक्षणासाठी गेली गेले ते तिकडेच त्यांना आपला देश आपली मातृभूमी आपली जन्मभूमी माता पिता आपली संस्कृती सर्व विसरुन जात आहेत त्यांच्याकडे फाजिल आत्मविश्वास व अहंकार आलेला दिसून येत आहे व सर्व जण स्वार्थी बनलेले आहेत आजचे योगे स्वार्थी थिक व अर्थ योग आहे आई-वडिलां जवळ जर काही धन पैसा जमीन घर आर्थिक मदत असेल तरच त्यांना सांभाळण्यात येते नाहीतर त्यांची हकालपट्टी वृद्धाश्रमात होत असताना दिसून येत आहे नात्यातील दुरावा वाढत चालला आहे व रक्ताचे नाते सुद्धा स्वार्थी बनत चाललेले आहेत सर्वजण पैशाच्या मागे धावत आहेत माणुसकी विसरत आहेत आज पर्यंत एकत्र एकाच घरात वाढलेली गोडीगुलाबीने राहणारे भाऊ दुसऱ्याच दिवशी एकमेकांचे शत्रू बनत आहेत अशाप्रकारे सख्खा भाऊ पक्का वैरी बनत चालला आहे वनात या नात्यातील सहसंबंध तुटत आहेत नाते हे विश्वासाचे राहिले नाही ही पती पत्नीचे नाते तर अत्यंत संवेदनशील पवित्र निर्मळ व स्वच्छ मनाचे नाते हे नाते फक्त विश्वासावरच अवलंबून आहे विश्वास आहे तर नाते आहे आधुनिक काळात विश्वास ढेपाळला आहे म्हणून आपण दररोज वर्तमानपत्रात अघटित बातम्या वाचतो पती-पत्नीमधील घटस्फोटा सारख्या घटना घडतात.

त्या आपल्या भारतात सुद्धा चालूच आहेत याचे खूप दुःख वाटते प्रत्येक माणसाची रूपे वेगवेगळी झालेली आहेत एकच व्यक्ती घरात कार्यालयात समाजात वेगवेगळे वागताना दिसतात अशी विचित्र अवस्था आज माणसांची झाली आहे वेगवेगळी नाती जपण्यासाठी आज माणूस धडपडत आहे परंतु मनाचा आंतरिक ओलावा संपत चालला आहे तो टिकविण्यासाठी प्रथम आपल्याकडे देश प्रेम राज्य प्रेम जिल्हा तालुका तसेच आपले जन्मगाव याबद्दल आदराची भूमिका असली पाहिजे भारत हा खेड्यांचा देश आहे तसाच तो नात्यांचा देश आहे सणांचा देश आहे देव-धर्म संतांचा देश आहे असे म्हणतात तसेच तो नात्यागोत्याचा देश आहे भारतीय संस्कृतीत वेगवेगळी सने उत्सव यात्रा हे सगळं नाते टिकवण्यासाठी केलेले असावे असे वाटते ऐतिहासिक विचार केला तर प्रसिद्ध महाकाव्य रामायणातील चार भावाभावांचे प्रेम श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न महाभारतातील पाच पांडव धर्मराज भीम अर्जुन नकुल सहदेव ज्ञानेश्वरीतील श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांचे नाते आपल्यासमोर आहे रामायण सारख्या महान व श्रेष्ठ काव्याचा विचार केल्यास रामायण कथेत भावाभावाचे अप्रतिम प्रेम नाते सावत्र आईचं नातं पिता-पुत्रांच्या नातं पती-पत्नीचं नातं आई वडिलांचं नातं एक ध्येयवादी त्यागी मुत्सद्दी एक वचने एक बाने एक पत्नीने राजा श्रीरामचंद्रांचे चे परदेशी असलेले ले आ तूट एक निष्ठ नाते तसेच गुरु शिष्य यांचे अतूट नाते हे असे अनेक दाखले आपल्याला देता येतील.

पूर्वी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आपल्या घरावर अतिथी देवो भव असे लिहीत असत नंतरच्या काळात शुभ लाभ असे लिहीत असत त्यानंतर वेलकम लिहिण्याची प्रथा आली आज तर कुत्र्या पासून सावध रहा असा बोर्ड आपल्याला दिसेल मित्रा मित्राचं नातं कसं असतं ते आपल्याला श्रीकृष्ण काळातील गोपिया तसेच कृष्ण सुदामा भेट यावरून दिसून येईल अनेक उदाहरणावरून आपल्याला दिसून येतं की आधुनिक काळाशी तुलना केली असता नातं नातं राहिलं नाही त्याचं जात होऊन नातं भरडला जात आहे आधुनिक नातं हे फक्त पैशाच्या तालावर नाचणारा नातं बनलं आहे आधुनिक सासू आणि सुनेच्या नात्याबद्दल तर काही बोलायचं शिल्लक उरलेला नाही पूर्वे सासु आणि सुनेचे नातं होतं ते माय-लेकी सारखं गाय वासराला सारखं परंतु आधुनिक यांना त्यातील वर्णन खालील ओळीतून स्पष्ट होते माय म्हणता म्हणता ओठओठा लाही भिडे सासू म्हणता म्हणता किती अंतरही पडे अशाप्रकारे नात्या नात्यातील गुंता संशयाने वाढत जात आहे आणि कधी कधी वाटते की जगातील सर्व प्रेम आटत चालले आहे काय प्रेमातील जिव्हाळा ओलावा संपत आला की काय आणि प्रेम देवता आपणा सर्वावर रुष्ट झाली आहे काय काळानुरूप आपल्या सर्वांना सुद्धा याचा अभ्यास करण्याची गरज आज आहे आणि म्हणूनच वाटते नात्यांचा ओलावा संपत आहे।

धन्यवाद . . . !🙏🏻🙏🏻

Related posts