भारत

१८ वर्षांवरील लसीकरण मोहिमेसाठी उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार

अठरा वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनावरील लस देण्याच्या मोहिमेला येत्या १ मे पासून सुरुवात होणार आहे. मात्र त्यासाठी २४ तारखेपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. को-विन ॲपवर लोकांना नोंदणी करता येईल.
नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असणार आहे. यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने डॉक्टर्स, सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले होते. आता १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत असून येत्या काही दिवसात रुग्ण संख्येच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने सरकारने १८ वर्षावरील सर्व लोकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे.

Related posts