Blog

माणसात देव शोधणारा संत – राष्ट्रसंत गाडगेबाबा.

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

————————————————————————————————————

23 फेब्रुवारी स्वच्छतेचे पुजारी,राष्ट्र संत गाडगेबाबांची जयंती आहे जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन ! गाडगे बाबांचे नाव काढताच आपल्या मनात एक प्रतिमा तयार होते हातात एक झाडू घेतलेला ,फाटके कपडे घातलेले, चित्रविचित्र पोशाख, गळ्यामध्ये एक गाडगं बांधलेलं, हातात काठी, ज्याप्रमाणे साधी राहणी व उच्च विचारसरणी म्हंटलं तर नवल नाही राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचं नाव माहीत नाही असा महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात कोनी सापडनार नाही

बाबांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवलेलं, गावागावात जायचे रस्त्याची स्वच्छता, नाल्याची स्वच्छता ,संपूर्ण गावाची स्वच्छता करणे स्वच्छतेचे काम बघून गावातील इतर लोकही त्यांच्यामध्ये सामील होत असत दिवसभर फिरून संपूर्ण गाव स्वच्छ करायचे नंतर संध्याकाळी गावातील चौकात किंवा मंदिरामध्ये गाडगेबाबा कीर्तन करत असत कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांना अंधश्रद्धा ,अज्ञान यापासून दूर राहण्याचा सल्ला देत असत आपल्या कीर्तनातून लोकांची जागृती करीत असत अंधश्रद्धा व अज्ञान यांची उदाहरणे देऊन लोकांची मने जिंकत व त्यांना अंधश्रद्धेपासून दूर राहन्यासाठी प्रयत्न करीत असत पशुपक्षी प्राण्यावर दया करा, त्यांची हत्या करू नका, त्यांना मारू नका,. कोणत्याही देवाला नवस करू नका नवस फेडन्यासाठी कोंबडी-बकरी यांना विनाकारण मारून त्यांचा बळी देऊ नका, कर्ज काढून देवाची यात्रा करु नका ,

स्वच्छतेच दुसरं नाव म्हणजे लक्ष्मी होय जिथे स्वच्छता व साफसफाई असते तिथे लक्ष्मीचा वास असतो आपल्या कीर्तनातून दगडाला देव मानणाऱ्या अंधश्रद्धाळू व्यक्तीवर प्रहार करत असत दगडामध्ये देव शोधण्यापेक्षा रंजल्या गांजल्या ची सेवा करा दीन दुखी ताची सेवा करा त्यातच तुम्हाला ईश्वर, देव भेटणार आहे बाबांचे किर्तन दोन्ही बाजूने असे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचे महत्त्व पाणी जपून वापरा, वृक्ष लावा वृक्ष जगवा, आपले घर अंगण रस्ते स्वच्छ ठेवा असे कळकळीने सांगत असत बाबांनी त्याकाळी सांगितलेले स्वच्छतेचे महत्त्व हे आपल्या आरोग्याशी निगडित आहे स्वच्छता असेल तर आपले आरोग्य चांगले व सुदृढ राहते आरोग्य हीच आपली संपत्ती आहे जी जपली पाहिजे पहाटे लवकर उठावे व व्यायाम करावा

गाडगेबाबांना दगडातील देव मान्य नव्हता ते मूर्तिपूजा पूजापाठ याला विरोध करत असत ते म्हणत माणसात देव शोधा व त्याची सेवा करा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशाप्रकारे ते आपल्या कीर्तनात तल्लीन होऊन जात असत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते हे भजन म्हणत म्हणत ते लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करीत असत काम केल्याने माणूस मोठा होतो जगात आज जी मोठमोठी किंवा श्रीमंत व्यक्ती बनलेली आहेत त्यांच्या जीवनाचा संघर्ष, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी केलेली कामे लोकांसमोर आणत संत गाडगेबाबा हे सत्यवादी होते गांधीजींचे सूत्र सत्य अहिंसा परमो धर्म हे त्यांना मान्य होते ते गांधीजींना आपले गुरु मानत असत

कुणालाही फसवू नये, सत्य वागावे, सत्य चालावे सत्य बोलावे, ही त्यांची शिकवण होती सत्य वागणारा व्यक्ती हा देवासमान असतो सत्यम शिवम सुंदरम सत्यापेक्षा कुणीही चांगला नाही म्हणून सर्वांनी मिळून मिसळून राहणे एकमेकांना मदत करणे एकमेकांची अडचण सोडवणे ही काळाची गरज आहे असं ते आपल्या कीर्तनातून सांगत पुढे त्यांनी धर्मशाळा बांधल्या ,मोठ मोठी दवाखाने उघडले, कुष्ठरोग्यांना त्यांनी मानाचे स्थान दिले व रोग्यांची ते सेवा सुद्धा करत असत वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून आपले कार्य करीत राहा नशिबावर अवलंबून राहू नका नशिबाच्या भरवशावर बसू नका आपले कर्मच आपला देव माना व कार्य करीत रहा असा मोलाचा संदेश राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी दिला खरोखरच किती अमूल्य संदेश आहे हा

आपणही आपल्या जीवनात हा संदेश जोपासावा व सत कर्मानेच आपले कार्य करत राहावे हाच त्यांच्या विचारांना दिलेला खरा न्याय असेल फक्त जयंती व पुण्यतिथी साजरी करून चालणार नाही तर त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणणे ही खरी काळाची गरज आहे
धन्यवाद।

Related posts