उस्मानाबाद 

पोलिस खात्यात भरती होण्यासाठी सुरू झाली धडपड ; तरुणवर्गांचा तयारीसाठी कसून सराव.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

दैनिक राजस्व. (उस्मानाबाद )-
स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता सरावासाठी तरुण कसून तयारी करताना दिसत आहेत.

राज्यात साडेबारा हजार पोलिसांचे पदे भरणार अशी माहिती राज्याचे गृहमंत्री यांनी दिली होती त्याअनुषंगाने तरुण सध्या तयारी करताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात भरती केव्हा निघणार याकडे सर्व तरुणांचे लक्ष लागले आहे . ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलिस भरतीची आस लावून बसले आहेत. कोरोना साथ आणि मराठा आरक्षाणाचा मुद्दा यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत पोलिस भरती करणाऱ्या तरूणांच्या विशेष वर्ग आहे. बारावी पास झाल्यानंतर पोलिस होण्याचे ध्येय ठेवून अनेक तरुण तरूणी तयारी करतात आधी लेखी परिक्षा होणार की शारीरिक चाचणी असा संभ्रम पोलिस भरती करणाऱ्या तरूणामध्ये निर्माण झाला आहे .

उस्मानाबाद शहारात ग्रामीण व शहरी भागातील तरुणांनी शारीरिक व लेखी परीक्षासाठी शहरातील नांमवत स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेऊन तयारीला लागले आहेत. शहरातील तुळजाभवानी स्टेडियम आणि हातलाई मंदिर परिसरात सकाळी व संध्याकाळी हे तरुण सराव करतांना दिसतात या सरावामध्ये धावणे, गोळा फेक इतर कसरती करताना दिसत आहेत. तसेच शहरातील अकँडमीमधे विविध विषयावर सराव करून घेतला जातो आता सर्व तरुणांमध्ये पोलिस भरतीची तारीख कधी निघणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे.

येत्या काळात पोलिस भरती झाल्यास ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना नोकरी मिळणार व आपण घेतलेले कष्टाचे फळ मिळणार आहे.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने ज्या पद्धतीने परीक्षाच्या तारखा जाहीर केल्या आहेत, तश्या प्रकारे राज्य सरकारने पोलीस भरतीच्या तारखा लवकर जाहीर कराव्यात, जेणेकरून खूप वर्षांपासून ग्रामीण भागातील युवक तयारी करीत आहेत त्यांना कुठं तरी न्याय मिळेल.

बाळकृष्ण उंबरे (सार्थक करिअर अकॅडमी उस्मानाबाद.)

Related posts