पंढरपूर

पंढरपूरात घर तिथे मनसेचा कार्यकर्ता असणार ः दिलीप धोत्रे

मनसे सभासद नोंदणीस सुरुवात

पंढरपूर ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारपासून सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. पंढरपूरसह सोलापूर जिल्हयातून विक्रमी संख्येने सभासद नोंदणी होईल. घर तिथे मनसेचा कार्यकर्ता असेल. असा विश्वास याप्रसंगी मनसेचे राज्य सरचिटणीस तथा शॅडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूरातील मनसेच्या कार्यालयात सभासद नोंदणीचा शुभारंभ दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. पंढरपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गणेश पिंपळनेरकर यांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे सभासद नोंदणी करून पंढरपूर विभागातील प्रथम सदस्य होण्याचा मान मिळवला.  

याप्रसंगी पुढे बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले , मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सभासद नोंदणी सुरू आहे. टाळेबंदीच्या काळात राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टिका करीत असताना. पंढरपूरसह सोलापूर जिल्हयातील सामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे काम मनसेने केले. दैनंदिन गरजा पुरवून सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचे संसार देखिल उभे करण्यामध्ये मनसेचा मोठा वाटा आहे. यांच मनसेच्या कार्याची जाणिव ठेवून सामान्य नागरीकांमधून मनसेचे सभासद होण्याची अनेक दिवसापासून आपल्याकडे मागणी होती. त्यामुळे येणा-या सभासद नोंदणी अभियानामध्ये मनसेचे राज्यामध्ये सर्वाधिक सभासद हे पंढरपूर आणि सोलापूर विभागातील विक्रमी अशा संख्येचे असतील.

 पक्षाकडून गावतिथे शाखा , वार्ड तिथे मनसेची शाखा अणि घर तिथे मनसेचा कार्यकर्ता असे अभियान राबविले जात आहे. याच पक्षांच्या धोरणाचा अवलंब पंढरपूरात होईल. एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एकमेकांवर टिका करीत आहे. सोयीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहे. यांचा प्रत्यय वीजबिलाच्या मुद्यांवरून नुकताच राज्यातील जनतेने अनुभवला. कारण अधिवेशानापूर्वी वीजबिल तोडणीला सरकारने स्थगिती दिली. आणि अधिवेशन संपल्यावर पुन्हा वीज तोडणी सुरू केली. त्यामुळे राज्यातील तीन पक्षांचे सरकार आणि केद्रांतील मोदी सरकार हे जनतेसाठी फ्ढसवे आहे. अशा काळात राजसाहेब ठाकरे यांच्या रूपाने मनसेचा पर्याय हा जनतेच्या पसंतीस सभासद नोंदणीच्या माध्यमातून उतरेल. असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाचंगे,महेंद्र पवार, स्वप्नील जाधव, धनंजय चव्हाण, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष प्रताप भोसले, तालुका अध्यक्ष प्रथमेश पवार, शुभम धोत्रे,नागेश इंगोले, महिला अध्यक्ष सौ रंजनताई इंगोले, उपाध्यक्ष सौ पूजा लवंगकर,उपाध्यक्ष महेश पवार, विश्वास पांढरे, यूराज घाटे, शुभम काकडे, अभिमान डूबल,अक्षय काळे, उपसरपंच दाजी शिंदे, वैभव इंगोले, मारुती ऐवळे, विक्रम तिकुटे इत्यादी उपस्थित होते.  

Related posts