पंढरपूर

यंदाची आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ ऑनलाईन पद्धतीने होणार. – डॉ. बी.पी.रोंगे (स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य )

पत्रकार परिषदेत डॉ. रोंगे यांनी दिली महत्वाची माहिती

सचिन झाडे –
पंढरपूर –

‘राज्यात नवनवीन संकल्पना आणि अभ्यासाचा स्वतंत्र ‘पंढरपूर पॅटर्न’ आमलात आणत असताना यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे सर्व शैक्षणिक प्रवेशाच्या प्रक्रियांना खूप विलंब झाला आहे. या दृष्टीने काही मुद्दे विचारात घेतले असता अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाल्या असून जवळपास सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्या असून आपला पासवर्ड/ओटीपी मात्र कोणालाही देवू नका, फसगत होण्याची शक्यता असते. स्वेरी अंतर्गत असलेल्या चार पैकी तीन महाविद्यालयांना मिळालेली एन.बी.ए. मानांकने व मिळालेला सुमारे ७.५ कोटी संशोधन निधी आमची उर्जा वाढवितात तर तिसरी आंतराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ ही दि.११ आणि दि.१२ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

महाविद्यालयातील घडामोडीचे विश्लेषण करण्याकरता आज बुधवार दि. ०९/१२/२०२० रोजी ‘पत्रकार परिषेदे’चे आयोजन केले होते. त्यात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सविस्तर माहिती देत होते. ते पुढे म्हणाले की, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग, सिव्हील इंजिनिअरींग, कॉम्प्यूटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग, इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींग या शाखांना ३० जून २०२३ पर्यंत एन.बी.ए. चे मानांकन मिळालेले आहे. बी. फार्मसीला ३० जून २०२२ पर्यंत, डिप्लोमा इंजिनिअरींगला ३० जून २०२२ पर्यंत (यामध्ये सिव्हील सोडून सर्व शाखा), डी.फार्मसी (प्रक्रिया सध्या सुरु), सध्या महाराष्ट्रातील जवळपास १४ टक्के महाविद्यालयांना एन.बी.ए.चे लाइव्ह मानांकन आहे. टेक्नो-सोसायटल २०२० ही तिसरी आंतराष्ट्रीय परिषद दि.११ आणि १२ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. ‘समाजाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर’ हा या परिषदेचा गाभा असणार आहे. या परिषदेमध्ये खालील मुद्द्यांवर भर असणार आहे:

पाणी, उर्जा, दळणवळण, हौसिंग आणि निर्जंतुकीकरण यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, मेकॅट्रोनिक्स, मायक्रो-नॅनो बायोसाठी समाजोपयोगी तंत्रज्ञान, रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया, ग्रामीण आणि शेती संबंधित व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी असणारे तंत्रज्ञान, वापरायोग्य परिसर व आरोग्यासंबंधी चे तंत्रज्ञान, दीर्घकाळ टिकणाऱ्या तंत्रज्ञानासंबंधी सर्वंकष दृष्टीकोन, माहिती व तंत्रज्ञानावर आधारित समाजोपयोगी तंत्रज्ञान, प्रयोगशाळा पातळीवरील आधुनिक समाजोपयोगी तंत्रज्ञान, सेन्सर, प्रतिमा आणि डेटा वर आधारित समाजोपयोगी तंत्रज्ञान, ग्रामीण आणि शेती संदर्भातील रोजगार निर्मिती साठीचे तंत्रज्ञान, समाजोपयोगी उत्पादन आणि नवनिर्मिती प्रक्रिया, ग्रामीण आणि अभियांत्रिकी विकास, ग्रामीण भारतासमोरील आव्हाने इ. यापूर्वी २०१६ साली पहिली व २०१८ साली दुसरी आंतराष्ट्रीय परिषद संपन्न झालेली आहे. या तिसऱ्या आंतराष्ट्रीय परिषदे साठी डॉ. विजय जोशी हे प्लेनरी स्पीकर व प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ (जो भारतातील पद्मविभूषण या पुरस्काराच्या दर्जाचा आहे) हा पुरस्कार मिळालेला आहे. या परिषदेत ‘कि नोट स्पीकर’ म्हणून विविध देशातील खालील संशोधक व अभ्यासक सहभागी आहेत. डॉ.विजय जोशी (ऑस्ट्रेलिया), डॉ. थॉमस मबुया (नैरोबी), बोतीर उस्मानोव्ह (उझबेकिस्तान), डॉ.एस.पी. अरुण (भारत), डॉ. यल्लोजी राव (अमेरिका), डॉ. मृणालिनी पत्तर्कीन (अमेरिका), या परिषदेसाठी जवळपास ३०० प्राध्यापक/ संशोधकांनी नोंदणी केली असून जवळपास ३५० संशोधनपर लेख सबमिट करण्यात आलेले आहेत., सर्व संशोधनपर लेख हे स्प्रींजर या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जाणार आहेत.

स्वेरीला मिळालेल्या संशोधन निधी विषयी माहिती देतांना डॉ. रोंगे म्हणाले ‘स्वेरीला आज पर्यंत जवळपास ७.५ कोटी एवढा संशोधन निधी प्राप्त झालेला आहे. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन म्हणजेच आर. जी. एस. टी. सी. कडून ४५ लाखांचा संशोधन निधी नुकताच प्राप्त झालेला आहे. डॉ. प्रशांत पवार यांनी ‘शेतीच्या विविध कामांसाठी ड्रोनचा वापर’ या विषयावर आधारित शोध प्रस्ताव आर. जी. एस. टी. सी. कडे मांडला होता. गेल्या सहा महिन्यांमध्ये सुमारे दीड कोटी एवढा संशोधन निधी विविध संशोधन प्रकल्पांमधून प्राप्त झालेला आहे. या निधीतून स्वेरीमध्ये विविध संशोधन सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत तसेच विविध प्रयोगशाळांची निर्मिती देखील या संशोधन निधीतून करण्यात आलेली आहे.

फंड फॉर इम्पृवमेंट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी (फिस्ट) या प्रकल्पातून ६० लाख रुपये एवढा निधी प्राप्त झालेला असून विविध विभागांच्या प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी हा निधी वापरला जात आहे. मॉडरायझेशन अॅन्ड रिमुअल ऑफ ओबस्लंस (मॉडरॉब) विविध विभागांच्या विविध प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी रुपये सुमारे ५० लाख एवढा निधी देण्यात आलेला आहे. स्वेरीतील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांना केंद्र शासनाच्या एआयसीटीई कडून ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवार्ड’ पहिल्या क्रमांकाने प्रदान करण्यात आलेला आहे.

स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन कक्षाचा लाभ घ्यावा. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे इ. बाबींसाठी ‘प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा.

शैक्षणिक विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची डॉ. रोंगे यांनी समर्पक उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेला स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या समवेत संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

Related posts