पंढरपूर

पंढरपुरात मनसेचा हजार महिलांचा मोर्चा धडकला तहसीलवर.

पंढरपूर/शहर प्रतिनिधी

महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करा या मागणीसाठी पंढरपूर येथे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारों महिलांचा मोर्चा तहसीलवर काढण्यात आला. यावेळी महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करा. अशा घोषणा देत हजारो महिला या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूरच्या तहसीलदार यांना देण्यात आले.
महाराष्टातील लाखो माता भगिनींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून व्यवसाय साठी कर्ज घेतली आहेत, गेली 15 ते 20 वर्ष झाले हे कर्ज घेत असून ते नियमित पणे परत फेड करत आले आहेत,
हे कर्ज घेत असताना मायक्रो फायनान्स कंपनी प्रत्येक महिलेकडून दिलेल्या कर्जाची सुरक्षा म्हणून दर वर्षी विमा पॉलिसीच्या नावाखाली हजारो रुपये घेतात, परंतु विम्याचे सर्टिफिकेट दिले जात नाही.

कोरोनाच्या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. कोणाच्याही हाताला काम नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे. पण व्यवसायच बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत. अनेक महिलांनी कर्ज घेऊन शेवया, पापड, यासारखे पदार्थ तयार केले होते, परंतु लॉक डाऊन मुळे तो माल विकला गेला नाही आणि 6 महिन्यात तो माल पूर्णपणे खराब झाला त्यामुळे त्या महिलेने घेतलेले पूर्ण कर्ज म्हणजे तिचे भांडवल बुडाले आहे, ती महिला पूर्ण संकटात सापडली आहे .
मायक्रो फायनान्सचे कर्मचारी रोजच त्या महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावत आहेत.

विम्याचे पैसे घेऊन देखील विमा देत नाहीत, जर विमा मिळाला तर या सर्व महिलांना दिलासा मिळेल, मायक्रो फायनान्स कंपनीकडे वारंवार विमा सर्टिफिकेटची मागणी करून देखील ते विमा सर्टिफिकेट देत नाहीत याचा अर्थ त्यांनी पैसे घेऊन देखील ते विमा कंपनी कडे भरले नाहीत.म्हणजे लाखो कोटी रुपयांचा घोटाळा या सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांनी केला आहे.याची सखोल चौकशी करावे. आशा अनेक महिला आत्महत्या करत आहेत. मायक्रो फायनान्स कंपनीना विम्याचे सर्टिफिकेट देण्यासाठी आदेश द्यावे आणि संपूर्ण वसुली थांबवावी ही विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे नेते
दिलीप धोत्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Related posts