महत्वाच्या बातम्या

आजचा दिवस सोलापूर जिल्हा मराठा आंदोलनाने गाजला

मराठा समाज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज प्रचंड आक्रमक झालाय,मराठा क्रांती मोर्चा च्या विविध संघटनांनी आरक्षणासाठी आज सोलापूर जिल्हा बंद ची हाक दिली होती, या बंद ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय ,संपूर्ण जिल्ह्यात आंदोलनाचा परिणाम दिसून आलाय जिल्हात बंद आंदोलनाला सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात झाली़ माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून देत आरक्षण स्थगिती निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या़ तर सोलापूर शहरात व्यापाऱ्यांनी मराठा आरक्षण समर्थनार्थ कडकडीत बंद पाळला. या बंदचे ग्रामीण भागात लोण पोहोचले असून ठिकठिकाणी रस्त्यावर येऊन सकल मराठा समाज्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले.बार्शी भाजप समर्थक आमदार राजा राऊत आणि मराठा समाज बांधवाबरोबर आंदोलन करीत मराठा समाजाला आरक्षणाला पाठिंबा दिलाय ,त्याचबरोबर पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी जागर गोंधळ करीत आसूड आंदोलन केलाय,

सोलापूर शहरातील नवीपेठेत मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून नारेबाजी करीत केंद्र आणि राज्य सरकार चा निषेध केला,मराठा समाज बांधवांनी शहरातून रूट मार्च काढीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला अभिवादन करून आसूड आंदोलनाला सुरुवात केली,

यावेळू आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्तेही सामील झाले होते,, त्यांनीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला,

त्यानंतर मराठा समाज बांधव मार्च काँग्रेस आमदार प्रणिती शिंद यांच्या घरावर धडकला ,मराठा समाज बांधव संख्या पाहता प्रणिती शिंदे स्वतःहून आंदोलांकर्त्यांच्या सामोरे जात त्यांचे निवेदन स्वीकारले,मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्याचे आश्वासन दिलाय

प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आंदोलनानंतर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख,विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आसूड आंदोलन करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या ,

मराठा समाज आरक्षण साठी मराठा बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. सोलापूर चे खासदार डॉ शिवाचार्य महास्वामीजीं दिल्लाला होते,तरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या मठासमोर आंदोलन करीत तेथल्या प्रतिनिधीला निवेदन देत सरकार चा निषेध व्यक्त केलाय

शहर जिल्ह्यातील मराठा आक्रमक आंदोलन पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मराठा आरक्षण बाबत विचार करावा लागेल अशी स्थिती समोर आलिय..

Related posts