पंढरपूर

पंढरपूरकडे येणारे वाहतूक मार्ग बंद , काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली.

आज उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणातील पाणी नियंत्रण उजनी व्यवस्थापनाच्या नियंत्रणा बाहेर जाताना दिसत आहे. उजनी धरणातून 1 लाख 85 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे.यामध्ये 2 लाख 50 हजार पाणी सोडले जात आहे. वीर धरणाच्या वरील तिन्ही धरणात पुरेसा पाणी साठा  होत असून  वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग सतत वाढत आहे. धरण क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे भिमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. वीर धरणातून ३२ हजारांचा विसर्ग सोडण्यात आला आहे.आज पहाटे हे पाणी सोलापूर जिल्ह्यात भीमेच्या पात्रात दाखल झाले असून भीमा नदी या पावसाळ्यात पहिल्यादाच  दुथडी भरून वाहत आहे.

पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे सोलापूर,विजापूर -पंढरपूर, मंगळवेढा या ठीकाणची वाहतूक बंद केली तर काही ठिकाणी वळविण्यात आली असल्याचे पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

दरम्यान,चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दुपार पर्यंत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

शहरातील व्यास नारायण, अंबाबाई पटांगण,लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास ५०० कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली. आज सकळी अजून ३०० असे एकूण ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जीव रक्षक, एनडीआरएफची टीम तैनात केली आहे असे पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

आज चंद्रभागा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.चंद्रभागा नदी पात्रामधील पुंडलिक मंदिरांसह इतर मदिरे,समाध्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत. जुना दगडी पूल ही पाण्याखाली गेला आहे. तर नदीपात्रातील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने शहर व ग्रामीण भागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Related posts