अक्कलकोट

मिजरगीच्या सरपंचपदी निंबाळ उपसरपंचपदी सिद्धाराम निंबाळ यांची बिनविरोध निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधु महादेव निंबाळ तर उपसरपंचपदी 21 वर्षीय सदस्य सिद्धाराम निंबाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मिरजगी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी सकाळी दहा वाजता सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. दुपारी बारा वाजता सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज स्वीकारणे, दुपारी साडेबारा वाजता अर्ज छाननी करण्यात आली. सरपंच पदासाठी मधु निंबाळ तर उपसरपंच पदासाठी सिद्धाराम निंबाळ यांचे एक – एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर नूतन सरपंच मधू निंबाळ व उपसरपंच सिद्धाराम निंबाळ यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या रखमा निंबाळ, भुताळसिद्ध मैंदर्गी, शावाबाई गवळी, भिमाण्णा पाटोळे, वंदना लोंढे, सुशिलाबाई पाटील, हावण्णा निंबाळ, सिद्धरामेश्वर विकास पॅनलचे प्रमुख माजी सरपंच गोपीचंद लोंढे , बसू निंबाळ, अण्णाप्पा निंबाळ ,सिद्धू गवळी, तंटामुक्त समिती अध्यक्ष मलकारी निंबाळ, सिद्धू निंबाळ, म्हाळाप्पा सोलापुरे ,पंचायत समिती सदस्य भौरम्मा पुजारी, लक्ष्मण निंबाळ, सुर्यकांत निंबाळ, यल्लाप्पा व्हनमाने, रमेश निंबाळ, हनुमंत जमादार, यल्लाप्पा निंबाळ, नामदेव मैंदर्गी, चंद्रकांत जमादार, बसवंत निंबाळ, परमेश्वर जमादार, विजयकुमार बिराजदार, शरणप्‍पा निंबाळ, धर्मा निंबाळ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडी प्रसंगी अध्यासी अधिकारी म्हणून श्रीमती बी.डी. माढे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेविका रोहिणी गोत्राळ, तलाठी गणेश कदम आदी उपस्थित होते .

सरपंचपदी निवड नंतर नूतन सरपंच मधु निंबाळ यांनी गावच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. शासकीय निधी मिळवून गावातील जी प्रलंबित कामे आहेत ती पूर्ण करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

Related posts