पंढरपूर

ईस्काॅन मंदिर येथे श्रीमद्भगवद्गीता जयंती विविध उत्सव संपन्न.

गीता ज्ञानदान महायज्ञ” व “गीता तुलाभार” कार्यक्रम

श्रील प्रभुपाद घाटावरील कृष्ण बलराम चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन

पंढरपूर –
श्रीधाम पंढरपुरातील पवित्र चंद्रभागेच्या काठावरील इस्कॉनच्या मंदिरामध्ये काल मोक्षदा एकादशी व गीता जयंतीच्या निमित्ताने “गीता ज्ञानदान महायज्ञ” व “गीता तुलाभार” कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमास इस्कॉनचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी सर्व भक्तांना व उपस्थितांना गीता जयंती निमित्त भगवद्गीतेवर आधारीत जीवन जगण्यास प्रेरणा व मार्गदर्शन दिले.

या शुभमुहूर्तावर प्रभुपाद घाटालगत कृष्ण बलराम चिल्ड्रन पार्क उद्घाटन माननीय आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब व मनसेचे प्रदेश सरचिटणीस श्रीमान दिलीपराव (बापू) धोत्रे यांच्या शुभहस्ते पार पडले.

सुमारे ५,१४७ वर्षांपूर्वी मोक्षदा एकादशीच्या शुभ दिनी कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या पहिल्याच दिवशी गोंधळलेल्या मनस्थितीतील अर्जुनाला निमित्त बनवून संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीता सांगितली. त्यामुळे हा दिवस मोक्षदा एकादशी बरोबरच गीता जयंती या नावानेही प्रसिद्ध आहे.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे हा दिवस “जागतिक गीता दिवस” म्हणून साजरा केला जातो तसेच डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण जगभर इस्कॉनचे भक्त विविध ऐंशी भाषांमधून भगवद्गीतेचे अधिकधिक वितरण करतात. यावर्षी भगवद्गीतेच्या वीस लाख प्रति वितरित करण्याचा इस्कॉन चा मानस आहे.

याचाच एक भाग म्हणून इस्कॉनचे पंढरपूर स्थित श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर येथे ये काल गीता जयंतीनिमित्त भगवद्गीता ज्ञानदान महायज्ञ व भगवद्गीता तुलाभार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर व पंढरपूर परिसरातून मान्यवर व भक्त उपस्थित होते. इस्कॉनचे वरिष्ठ भक्त श्रीमान धर्मराज दास यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

तसेच कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान प्रल्हाद दास, श्रीमान चक्रधर दास व श्रीमान रामदरबार दास यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related posts