पंढरपूर

कोरोना कालावधीत निराधार झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व वसंतदादा काळे शैक्षणिक संकुलाने स्वीकारले .

राज्यातील पहिला आदर्श उपक्रम

प्रतिनिधी ( सचिन झाडे) –

पंढरपूर दि. १८ – कोरोना कालावधीमध्ये अनेकांचे पालकत्व हरवले अशा विद्यार्थ्यांना मायेचा आधार देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलाने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत प्रांतअधिकारी गजानन गुरव यांनी व्यक्त केले.ते वाडीकुरोली ता. पंढरपूर येथील वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आज कोरोनामुळे आई वडिलांचे दुर्दैवी निधन झाल्याने निराधार झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शालेय साहित्य व इयत्ता बारावी पर्यंत दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या वसंतदादा काळे शैक्षणिक पालकत्व योजने प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले भावनिकतापेक्षा संवेदनशीलता महत्त्वाचे असून ती समाजउपयोगी प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते याच सामाजिक बांधिलकीतून हा आदर्श उपक्रम होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे हे होते अध्यक्षीय भाषणात काळे म्हणाले की, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून वसंतदादा काळे यांच्या प्रेरणेतून आजपर्यंत उज्वल शैक्षणिक वाटचाल चालू आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहून संस्थेने वेगवेगळे उपक्रम राबवून आधार दिला आहे कोरोना मुळे ज्यांचे पालकत्व हरपले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना मायेचा आधार देण्यासाठी शैक्षणिक साहित्याबरोबरच भरीव आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी दिनकर चव्हाण सुधाकर कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे त्यांनी केले यावेळी महादेव नाईकनवरे ,रावसाहेब देशमुख, युवा गर्जनाचे अध्यक्ष समाधान काळे ,राजाभाऊ माने ,जुलूस शेख, नवनाथ माने,माजी संचालक हनुमंत सुरवसे वसंत दादा मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शिंनगारे व पालक उपस्थित होते.

शैक्षणिक संकुलाच्या वतीने राबवलेला राज्यातील पहिला उपक्रम असून वसंतदादा काळे पालकत्व योजनेच्या माध्यमातून संस्थेत शिक्षण घेत असलेल्या पाचवी ते बारावी , आयटआय ,नर्सिंग पर्यंतचा संपूर्ण खर्च , शैक्षणिक साहित्य व मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

Related posts