कविता 

होती एक सावित्री माता—-

होती एक सावित्री
जीने अज्ञानाचा
काढून काटा
केल्या मोकळ्या
ज्ञानाच्या वाटा
होती एक सावित्री
जिने फुलांचा मळा सोडून, शिक्षणाचा मळा, फुलवायला सुरू केला
जातिभेदाच्या भिंती
पोखरून माणुसकीचा
रस्ता केला खुला
होती एक सावित्री
जिने शिक्षण रुपी शस्त्राने अंधश्रद्धेवर घालून घाव
समाज सावध केला!
होती एक सावित्री
समाजासाठी स्वतःवर
शब्दाचे, अपमानाचे, दुःखाचे, घाव झेलून केले समाजाचे
शुद्धीकरण !
होती एक सावित्री
आज दिनी होते तिच्या
ज्ञानाची स्मृती!!

======================================================================================================

कवि:-
देविदास पांचाळ सर,
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts