उस्मानाबाद  कळंब

डिकसळ मध्ये आता आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा सरपंच अमजद मुल्ला यांच्या प्रयत्नांना यश.उपनगराध्यक्ष मुंदडा यांचा कर्तव्यदक्षपणा

सलमान मुल्ला,
कळंब प्रतिनिधी.

याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहराला लागूनच असणाऱ्या डिकसळ येथे मागील बऱ्याच दिवसापासून आठवड्यातून केवळ एक दिवस 45 मि. करिता पाणीपुरवठा होत होता.

या पाणीपुरवठा बाबत येथील नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली होती वारंवार नगरपालिकेत तक्रार करून देखील आपल्या हक्काचे पाणी भेटत नसल्याने रहिवाशांनी सरपंच अमजद मुल्ला यांच्याकडे विचारणा केली असता अमजद मुल्ला यांनी ह्या पाणीपप्रश्नी जातीने लक्ष देऊन तात्काळ नगराध्यक्ष संजय मुंदडा यांना निवेदन देऊन डिकसळ परिसरात आठवड्यातून दोन वेळेस पाणी सोडण्याची मागणी केली आहे..

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनदेखील विनाकारण नागरिकांना पाणी कपातीस सामोरे जावे लागत होते या करिता डिकसळ ग्रामपंचायत सरपंच अमजद मुल्ला यांच्या वतीने कळंब न.प. उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती संजयजी मुंदडा यांना विनंती अर्ज केला असता त्यांनी नागरिकांना होत असणारी अडचण लक्षात घेत तात्काळ आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी लेखी आदेश काढले…

यामुळे आता डिकसळ करांना आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे निर्णयाचे सर्व डिकसळ वासियांकडून कौतुक व समर्थन होत आहे…


डिकसळ येथील रहिवाशांना आठवड्यातून किमान दोन वेळेस पाणीपुरवठा व्हावा यासाठी सरपंच अमजद मुल्ला यांनी दिलेल्या अर्जाची दखल घेत आम्ही आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करा असे लेखी आदेश जारी केलेले आहेत तरी नागरिकांना पुढील आठवड्यापासून आठ दिवसातून दोन वेळेस पिण्याचे पाणी मिळेल
-संजय मुंदडा (उपनगराध्यक्ष कळंब नगरपालिका तथा पाणीपुरवठा सभापती कळंब)

Related posts