महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ‘स्वाभिमानी’ पाहिजे, मग मतांसाठी का नाही?

पंढरपूर : एका बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी चे पैसे थकवायचे आणि दुसरा बाजूला निवडणुकीसाठी लाखो रुपयांचा खर्च करायचा अशा पद्धतीने भाजपा व राष्ट्रवादी च्या उमेदवाराचे काम सुरू आहे. एका बाजूला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तर दुसऱ्या बाजूला कारखानदार असे चित्र आहे. निवडणुकीत शेतकरी कष्टकरी हे शेतकर्‍याच्या पोराला साथ देतील, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन अरूण शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी, गोपाळपूर, अनवली, एकलासपूर, शिरगाव आदी भागात रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा घेण्यात आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दुधासह शेतीमालासाठी आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी पाहिजे, मग मतासाठी का नाही? असाही सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला. सरकारने वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्याचे कनेक्शन कट केले, शेतकर् यांना दिलेली आश्वासनांने पाळली नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये केंद्र व राज्य सरकार बद्दल नाराजी आहे असेही तुपकर म्हणाले. यावेळी विदर्भ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दामोदर इंगोले, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, माजी उपसभापती विष्णू बागल, रवीकिरण माने, धैर्यशील पाटील, नानासाहेब चव्हाण, सोमनाथ घोगरे, सिद्धेश्वर घुगे यावेळी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी संघटनेच्या उमेदवाराला देणगीही दिली.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना रविकांत तुपकर यांचा फोन:
शिरगाव ( ता. पंढरपूर) येथे प्रचार सभेत ग्रामस्थांनी विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. सभेनंतर रविकांत तुपकर यांनी संबंधित महावितरणाच्या अधिकाऱ्याला तात्काळ फोन करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा महावितरणच्या कार्यालयापुढे ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला.

फोटो : अनवली येथील सभेत मार्गदर्शन करताना रविकांत तुपकर. यावेळी उपस्थित विष्णू बागल, दामोदर इंगोले, अमोल हिप्परगे व इतर

Related posts