Blog

कोरोणा महामारी काळातील जगण कस असावं?

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

==================================================================================

मित्रांनो, आजचा काळ खूप घातक आहे ,संघर्षपूर्ण, तणावपूर्ण जीवन होऊन बसले आहे जगणं अवघड झालं आहे, म्हणून घाबरू नका चिंता किंवा काळजी करू नका तर स्वतःची काळजी घ्या सरकारने केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा व आपली जबाबदारी, नैतिक जबाबदारी सांभाळा विशेषतः आपल्या कुटुंबातील लहान मुले व वृद्ध व्यक्तींना सांभाळा प्रत्येक बाबीला नियम लागू होत नसतात तर ते स्वतः लावायचे व पाळावयाचे असतात.

आज सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे! दिवसाला लाखोंच्या संख्येने कोरोना घात करीत आहे सर्वत्र गर्दी! हॉस्पिटल भरून गेले, रुग्णाला बेड उपलब्ध नाहीत, बेड मिळाले तर ऑक्सिजन उपलब्ध नाहीत, ही अवस्था चालू आहे एवढंच नाहीतर स्मशान भूमीत ही जागा उरलेली नाही रांगा लागत आहेत मित्रांनो सावध व्हा जागे व्हा रात्रंदिवस वैऱ्याची आहे!! आज उस्मानाबाद येथे एकोणवीस प्रेते एकत्र जळताना दिसतात!!! महाभयंकर दृष्य आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहत आहोत व अनुभव करीत आहोत म्हणजे आज आपल्यासमोर कोरोणा ची लढाई, आहे, युद्ध सुरू आहे, कोरोना महामारी ला हरवायचे असेल तर आपल्या हाती असलेल्या सर्व शस्त्रांचा वापर करणे खूप आवश्यक आहे खालील शस्त्र आपल्यासाठी खूप सुरक्षित आहेत स्वतः मास्क वापरणे, सतत साबणाने हात धुणे, सॅनिटायझर चा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, प्रवास यात्रा लग्नसमारंभ टाळणे ,अनावश्यक घराबाहेर न पडणे ,घरीच बसून वर्क फ्रॉम होम करणे ,आपल्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना फोण द्वारे आत्मबल वाढेल अशी माहिती सांगणे, सांत्वन करणे, विनाकारण इकडच्या-तिकडच्या संख्या, रुग्ण ,अडचणी, सतत रिपोर्ट सतत सांगून किंवा विचारुन चांगल्या व्यक्तीची मानसिकता बिघडवू नये. भीती वाटेल असे बोलू नये अशीच चांगली सुरुवात झालेली होती, आता कुठे जीवन सुरळीत चालू होत होते, लगेच कोरोणा महामारी ने आपले राक्षसी कार्य सुरु केले व लाखोंच्या संख्येने मृत्यू होऊ लागले.

एवढा कसला कुठला विषाणूने मृत्यूचे तांडव सुरू झाले !!लॉकडाऊन काही सर्व काही नाही परंतु त्यामुळे कोरोंणा ची साखळी जरूर तुटते पण काही लोकांना वाटते की लॉकडाऊन माझ्यासाठी नाही लोकांसाठी आहे! पण कोरोनाविषाणू तसं मानत नाही ‘मी’ ‘मी’ म्हणणारे लाखोंच्या संख्येत सामील झालेले आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत आज लॉक डाऊन तोडायला जरी पळवाटा असल्या तरी हॉस्पिटल आणि बेड मिळवायला आणि इंजेक्शन मिळवायला सध्यातरी पळवाटा नाहीत!! म्हणून कृपया आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी शासनाने विश्वास पूर्ण काढलेल्या लसी बद्दल सामान्य जनतेला जागृत करणे व लस घेण्यास प्रवृत्त करणे ही आजच्या सुजाण नागरिकांची मोठी जबाबदारी आहे. फक्त व्हाट्सअप च्या माध्यमातून केलेल्या कामावर टीकाटिप्पणी देणे एवढेच आपले कार्य नाही तर एकमेकांना मदत करून समजून घेऊन गरीब गोरांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणे हे ही फार मोठे देशकार्य आहे.

आज अशा महाभयंकर कोरोणा विषाणूच्या काळात पोलीस दलातील हजारो अधिकारी व सर्व कर्मचारी, तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व सर्व कर्मचारी, तसेच शासकीय अशासकीय सर्व कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून आपली ड्युटी प्रामाणिकपणे करीत आहेत!! त्यांना आपण सर्वजण घरी बसणारे( योद्धा) लॉकडाऊन चे नियम पाळून सहकार्य केलेच पाहिजे ही सर्व मंडळी या आजच्या काळात देव रूपाने कार्य करीत आहेत पोलिसांचे बरेच उल्लेखनीय असे प्रसंग आपण टीव्हीच्या माध्यमातून पहात आहोत आपल्याला सांगता येतील रस्त्यावर फिरणारे भिकारी, गरीब, दीन ,दुबळे ज्यांना भोजन मिळत नाही अशा व्यक्तींना स्वतः पोलिसांनी आपले स्वतःचे डबे खाऊ घातले आहेत! डिलिव्हरी साठी निघालेल्या अनेक महिला पेशंटला परिस्थिती ओळखून स्वतः पोलिसांच्या गाडीत त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे व सुविधा पुरविण्यात आली आहे. वृद्धांना मदत करण्यात आली अशावेळी असा प्रसंग पाहून खरोखरच माणुसकी कुठेतरी जिवंत आहे असा आनंद मनाला मिळतो मित्रांनो, आपल्याला एकच काम करावयाचे आहे ते म्हणजे आपण आणि आपले कुटुंब कसे सुरक्षित राहील यासाठी घराबाहेर पडायचे नाही.

खरंतर आपल्या वाचून जगाचं काही आडलेलं नाही आणि पुढेही आडणार नाही. आपले युद्ध कोरोणाशी, कोरोना शत्रुशी सुरू झाले आहे, कोरोणा झालेल्या व्यक्तीशी नाही म्हणून सर्वांनी अत्यंत संयमाने विचाराने कार्य करणे खूप गरजेचे आहे सध्या पोलीस व आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण पडलेला आहे सर्वजण बघतच आहेत कित्येक पोलीस, डॉक्टर ,शिक्षक, कर्मचारी, आशा कार्यकर्ता कोरोना ने बाधित झालेल्या आहेत यापेक्षा ती भयंकर परिस्थिती कोणती असेल अशा अवस्थेत आश्चर्य वाटते! काही लोकांना तर कोरोणा नाही किंवा खरा काय आणि खोटा काय? याच विचारात आहेत आज उस्मानाबाद मध्ये एकाच वेळी 19 चिता जळताना चा हा हृदय हेलावणारा प्रसंग आपण पाहू शकतो !विश्वास बसत नाही ना! म्हणून जागे व्हा ,जागृत व्हा, अजून काही लोक कोरोणाच्या या विश्वात दाखल झाले नसल्यासारखे वागताना दिसून येतात गेल्या वर्षभरापासून चालू असलेला हा भयानक प्रसंग आहे कितीही लिहिला तरी संपत नाही, फक्त अनुभव घेत राहा व एकमेकांना मदत करत राहा आपण आनंदी व दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा जो जिथे असेल तिथे माणुसकीचे दर्शन घडवा कारण आज सर्व मंदिरे प्रार्थनास्थळे पुन्हा बंद आहेत! आणि आपल्याला वाचवण्यासाठी पुन्हा कोणीही येणार नाही!

देवाच्या रुपाने हे सर्व जण आपल्याला सेवा पुरवत आहेत ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आलेला दिवस आनंदाने काढा व उद्याच्या दिवसासाठी देवाला प्रार्थना करा उद्याचा दिवस मला व माझ्या कुटुंबासाठी आनंदी असुदे एवढीच प्रार्थना करूया कृपया शासकीय प्रशासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन स्वतः करूया व इतरांनाही करण्यासाठी जागृत करूया चीनने लावलेलं कोरोना महामारीच हे रोपटे आज जगभर हातपाय पसरल आहे त्याच्या फांद्या विषारी फुले, मुळा या जगभर पसरून गेलेल्या आहेत आणि आपण तोच विषारी कोरोणा फुलवण्याचे काम करीत आहात! त्याचा नायनाट आपल्याला करावयाचा आहे त्याला मुळापासून नष्ट करावयाचा आहे मागे तसं पुढे होऊ नये म्हणून आवर घालण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करू या जागे व्हा रात्रंदिवस वैऱ्याची आहे काळजी घ्या, सुरक्षित राहा।
धन्यवाद🙏🏻🙏🏻

Related posts