Blog

जागतिक वन दिवस – पर्यावरण रक्षण व संवर्धन ; काळाची गरज…

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद.

—————————————————————————————————

मित्रांनो, जागतिक वन दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करणे, वृक्षसंवर्धन करणे ,वृक्षा वर प्रेम करणे, निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश देण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न जागतिक वन दिवस म्हणून सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो पण फक्त वन दिन साजरा करून चालणार नाही ,त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने प्रामाणिकपणाने निसर्गाची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे आपण जिथे राहतो ज्या परिसरात वावरतो ,ज्या निसर्गात राहतो तेथील माती, पाणी, हवा, वृक्ष, वेली ,फुले यांचा सदैव आपल्याला उपयोग होत असतो

निसर्गाने आपल्याला सर्व काही भरभरून दिलेले आहे निसर्गाने आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक अन्नधान्य, प्रत्येक ऋतुमानानुसार वेगवेगळी फळे, वेगवेगळी फुले, आपल्याला मोफत दिली आहेत आपण त्याचा भरपूर उपभोग ही घेत असतो उन्हाळ्याच्या दिवसात आंबे ,वेगवेगळ्या प्रजातीचे द्राक्षे, टरबूज, खरबूज ,तसेच जांभळे, सीताफळ, रामफळ, बोरे ,चिंचा, आवळा ,तसेच विविध प्रकारच्या आरोग्यदायी वनस्पती, औषधी आपल्याला निसर्गापासून मिळतात प्राचीन काळातील महाकाव्य रामायणातील ऐतिहासिक प्रसंग, उदाहरण आपल्यासमोर आहे लक्ष्मणाला शक्ती लागल्या नंतर महावीर,महाबली,हनुमान बजरंगबलिने जी ने आणलेली संजीवनी नावाची वनस्पती ही सर्व जगात प्रसिद्ध आहे तेव्हा असा अनमोल निसर्गाचा ठेवा आपल्याला मिळालेला आहे त्याची जोपासना करणे त्याचा सांभाळ करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे

तसा त्याचा वापर आपण पूर्णपणे करतो पण ज्यापासून आपल्याला अन्न, वस्त्र, पाणी, हवा ,ऑक्सिजन, मिळते नेमके त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत निसर्ग आपला जीवन साथी आहे वृक्ष आपले मित्र सखा आहेत त्यांचा सांभाळ आपण केलाच पाहिजे संतांनीसुद्धा शेकडो वर्षापूर्वी आपल्याला पशुपक्षी प्राण्यांचे व निसर्गाचे वेली फुलांचे महत्त्व समजावून दिलेले आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे— फक्त उपदेश करणे किंवा लेखन करून चालणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष स्वतःला झोकून देऊन सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा लागतो हे एक महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे वृक्ष लावणे व वृक्षाचे संवर्धन करणे ही खरी काळाची गरज आहे निसर्ग बदलत आहे वेळीअवेळी निसर्ग चक्रात बदल होतो आहे त्यासाठी आपण सुद्धा सावध राहून दूरदृष्टी ठेवून भविष्यकाळाचा वेध घेतला पाहिजे व कार्याला लागले पाहिजे

पूर्वी आपले आजी, आजोबा-पणजोबा यांनी लावलेले आंब्याचे झाड असेल त्याची फळे आज आपण व आपली मुले आनंदाने खात आहोत हाच सकारात्मक विचार आणि कार्य आपण पुढे चालू ठेवले पाहिजे वृक्षारोपण करणे व त्याचे लहान बाळा प्रमाणे संगोपन करणे ही खरी काळाची गरज आहे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपण आमच्या शाळेचे उदाहरण देऊ शकतो श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या माझ्या सुंदर,समृद्ध शाळेत विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर यांच्या अनोख्या सकारात्मक उपक्रमातून व सर्व माझे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यातुंन माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आज पर्यंत हजारो झाडांची लागवड केलेली आहे हजारो वृक्ष लावलेले आहेत व त्यांचे लहान बाळा प्रमाणे संगोपन केले आहे

आज ही झाडे हळूहळू मुलांप्रमाणे मोठी झालेली आहेत व फुले, फळे, सावली देत आहेत अगदी माळरानावर कडक अशा उन्हाळ्यातसुद्धा सुंदर हिरवाईने नटलेली सजलेली सुंदर शाळा दिसते वृक्षांनी फुलांनी पाने वेलीने हिरवीगार आपल्याला दिसून येते हे आपल्यासाठी एक आदर्श उदाहरणच आहे आधुनिक काळात वनांचे संरक्षण करणे वनांचे संवर्धन करणे खूप महत्त्वाचे झालेले आहे वनाचे क्षेत्र वाढविण्याची खूप गरज आहे वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे मोठ-मोठी वने नष्ट होताना दिसत आहेत भरमसाठ वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो आहे पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे व या निसर्गाच्या असंतुलनामुळे पृथ्वीवरील हजारो पशु-पक्षी प्राण्यांचा मृत्यू होत आहे तसेच विविध जातीचे किटक पक्षी फुलपाखरे चिमण्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आज पर्यंत दुष्काळामुळे वृक्षतोडीमुळे हजारो अशा जाती नष्ट झालेल्या दिसून येतात पर्यावरणाचे रक्षण करणे सांभाळ करणे आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे

नैतिक जबाबदारी स्वीकारून या जबाबदारीचे पालन करून एक मूल एक झाड अशा पद्धतीने झाड लावून त्यांचे संगोपन केले तरी कोटी च्या संख्येत वृक्ष आपल्याला बघायला मिळतील वृक्ष लावा वृक्ष जगवा ही संकल्पना सतक नेहमीसाठी कार्यरत असली पाहिजे यासाठी आपण विविध माध्यमातून जनजागृती करू शकतो विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वृक्ष लागवड केली जाते पावसाळ्यात केलेली वृक्ष लागवड ही जास्त फायदेशीर ठरते कारण अशा वृक्षांना जास्त पाणी देण्याची गरज भासत नाही व हे वृक्ष मुळापासून जमिनीशी मातीशी एकरूप होतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वृक्षारोपण शाळेच्या माध्यमातून शाळा ,शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरण जागृती करता येते त्यामध्ये वृक्षारोपण करणे, वृक्षदिंडी, काढणे ,जलदिंडी काढणे, साक्षरता अभियान दिंडी काढणे, तसेच पर्यावरणाशी संबंधित भूगोल दिन, पर्यावरण दिन, जागतिक निसर्ग संवर्धन दिन, वसुंधरा दिन साजरा करणे पर्यावरण विभागामार्फत तसेच हरित सेनेच्या माध्यमातून हे उपक्रम आपण राबउ शकतो

निसर्गही आपल्यासाठी एक वरदान आहे पर्यावरण सांभाळा हाच खरा जीवनाचा आधार आपल्याला मिळणारा शुद्ध प्राणवायू हा पर्यावरनातूनच आपल्याला मिळतो वृक्ष आपले जीवन साथी, का बरे वृक्ष तोडती! नका घालू झाला वृक्षावर ,नका करू आत्याच्यार वृक्षावर!! आपला येणारा, आपला भविष्यकाळ सुखी समृद्धी करण्यासाठी सर्वांनीच पर्यावरणाची काळजी घेऊया व पर्यावरणाचे संरक्षण करू या…!

धन्यवाद।🙏🏻🙏🏻

Related posts