उस्मानाबाद  तुळजापूर

योगेश केदार यांची विभागीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीवर निवड.

प्रतिक शेषेराव भोसले
सलगरा दिवटी, प्रतिनिधी

सलगरा दिवटी गावचे सुपुत्र तसेच खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे स्विय सहायक योगेश केदार यांची भारतीय रेल्वे च्या सोलापूर विभागीय रेल्वे प्रवासी सुविधा समिती वर निवड झाली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दृष्टीने हा सर्वात मोठा विभाग आहे.

योगेश केदार यांनी यापूर्वीही दिल्ली मध्ये राहून सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे साठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. खा. छत्रपती संभाजी महाराजांच्या निकटवर्तीय असलेल्या योगेश केदार यांचे उस्मानाबाद तुळजापूर रेल्वे करीता निधी मंजूर करून आणण्यात योगदान आहे.

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि सदस्यांच्या धोरणात्मक बैठका होत असतात. त्यामध्ये उपस्थित राहून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, मत मांडणे, नवीन रेल्वे प्रकल्पांची मागणी करणे, व रेल्वे प्रवाश्यांच्या सर्व सोयी सुविधांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी सदस्यांची असते.

गेल्या पाच वर्षांपासून मी सोलापूर तुळजापूर रेल्वे साठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. अडगळीत पडलेला हा प्रकल्प संभाजीराजे छत्रपतींच्या माध्यमातून, आणि अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांतून मंजूर करण्यात भूमिका निभावली. शेकडो कोटी रुपये मंजूरही झाले. प्राथमिक स्तरावर २० कोटी रुपये वर्गही झाले आहेत. यापुढे सुद्धा भरपूर गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे या पदाचा उपयोग नक्की होईल आणि मी त्या पदाला न्याय देईन हा विश्वास आहे असं योगेश केदार म्हणाले.

Related posts